मुंबईअजित पवार (Ajit Pawar)  यांनी बंडखोरी केल्यापासून अजित पवार गट विरुद्ध शरद पवार (Sharad Pawar)  गट हा वाद अधिकच पेटलेला आहे. या दोन्ही गटातील नेत्यांकडून वार-प्रतिवार होत आहेत. दोन्ही गटातील नेते नाव न घेता अप्रत्यक्षपणे ऐकमेकांवर नाव न घेता टीका करत असतात. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP)  शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यातील ‘कोल्ड वॉर’ काही नवे नाही.  बंडखोरीनंतर कायमच ऐकमेकांवर अप्रत्यक्षपणे टीका करताना दिसले. आता थेट ऐकमेकांचे नाव घेत टीका करण्यास सुरुवात केली आहे.  जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांच्या वाढलेल्या पोटावर टिप्पणी केली  आहे. दादा तुम्ही व्यायाम करुन ‘सिक्स पॅक अब्ज’ तयार केले असतील. पण हा परवाचा फोटो त्यात तुमची ढेरी दिसतेय, असे म्हणत  आव्हाडांनी अजित पवारांचा ढेरपोट्या फोटो शेअर केला आहे.


जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांचा फोटो एक्स या प्लॅटफॉर्मवर ( पूर्वीचे ट्विटर) शेअर केला आहे.  अजित पवारांनी आव्हाडांच्या पोटावर केलेल्या टीकेवर आव्हाडांनी टीका केली आहे.  "दादा त्या दिवशी पत्रकार परिषदेत तुम्ही माझ्या वाढलेल्या पोटाचा उल्लेख केला. तेव्हा मला वाटले की, तुम्ही व्यायाम करुन सीक्स pack abs केले असतील पण हा परवाचा  फोटो तुमची ढेरी दाखवतो", असे म्हणत जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांचा पोट पुढे आलेला फोटो शेअर केला आहे.  त्या फोटोनंतर जितेंद्र आव्हाड यांनी शेअर केलेल्या फोटोवर स्पष्टीकरण दिले आहे. "दादा तुम्ही माझ्यावर वैयक्तिक बोलला नसतात तर मी तर आपल्या विरोधात एक शब्द काढला नव्हता. मग माझ्यावर दर वेळेस वयक्तिक टीका कशासाठी?", असा सवाल जितेंद्र आव्हाडांनी केला आहे. 






 राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या भाषणाच्या खास शैलीसाठी प्रसिद्ध आहेत. आपल्या भाषणामध्ये बोलता बोलता अजित पवार सहज विरोधकांना टोला लगावताना अनेकदा पाहायला मिळाले आहेत. 'ठाण्याचा पठ्ठ्या' म्हणत अजित पवारांनी अनेकदा शरद पवार गटातील आमदार जितेंद्र आव्हाडांवर टीका केली आहे. यावरुन जितेंद्र आव्हाडांनीही त्यांना अगदी ठाण्यात पोस्टरबाजी करुन उत्तर दिलं आहे. आता या फोटोनंर नवा अध्याय सुरू झाला  आहे.