(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाड यांच्यावर केलेले आरोप हास्यास्पद, आम आदमी पक्षाकडून निषेध
Jitendra Awhad :राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्याविरोधात महिलेनं केलेल्या तक्रारीचा आम आदमी पक्षानं (Aam Aadmi Party) निषेध केला आहे
Aam Aadmi Party : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्याविरोधात महिलेनं केलेल्या तक्रारीचा आम आदमी पक्षानं (Aam Aadmi Party) निषेध केला आहे. आव्हाड यांच्यावर लावण्यात आलेले आरोप हे हास्यास्पद असल्याचे मत आपच्या नेत्या प्रीती शर्मा मेनन (Preeti Sharma Menon) यांनी व्यक्त केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) स्वतः या कार्यक्रमाला उपस्थित होते. तेथून जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) बाहेर पडताना दिसत आहेत, मग तक्रार का? असा सवालही मेनन यांनी केला आहे.
जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्याविरोधात एका महिलेनं विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्यानंतर, त्यांनी आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचे ट्वीट केले आहे. त्यानंतर आज सकाळपासून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केली आहेत. मुंब्रामध्ये बंद पाळण्यात आला आहे. तर, दुसरीकडे काही ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तर दुसरीकडे जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांनी पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच विविध राजकीय नेत्यांनी आव्हाड यांच्याविरोधात केलेल्या तक्रारीचा निषेध केला आहे.
सत्ताधारी पक्षाकडून लोकशाहीची हत्या, आपचा आरोप
राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करणे हे हास्यास्पद असल्याचे आम आदमी पार्टीनं म्हटलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय पक्ष खालच्या पातळीचे राजकारण करत आहेत. सत्ताधारी पक्षाकडून लोकशाहीची हत्या होत असल्याची टीकाही यावेळी आपच्या नेत्या त्यावेळी त्यांनी केली. आम आदमी पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस किंवा जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्याशी कोणताही संबंध नाही. त्यांच्या भ्रष्टाचाराविरोधात आम्ही अनेकदा आवाज उठवला आहे. पण एकनाथ शिंदे यांच्या सांगण्यावरुन आणि देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेत्यांवर असे हास्यास्पद आणि खोटे आरोप लावले जातात. आम्ही त्याच्या विरोधात असल्याचे मेनन यांनी म्हटलं आहे.
नेमकं प्रकरण काय?
माजी गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी ट्वीट करत एक मोठा बॉम्ब फोडला आहे. आमदारकीचा राजीनामा देत असल्याचं जितेंद्र आव्हाडांनी ट्वीट केलं आहे. पोलिसांनी 72 तासांत दोन खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केला आहे. लोकशाहीची हत्या उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाही, असं जितेंद्र आव्हाडांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. हर हर महादेव सिनेमावरुन विवियाना मॉलमध्ये झालेल्या राड्याप्रकरणी जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याप्रकरणी त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. तर काल कळवा-मुंब्रा नवीन पुल उद्घाटनाच्या कार्यक्रमादरम्यान एका महिलेनं जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा आरोप केला आहे. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे दोन गुन्हे दाखल झाल्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी आमदारकीचा राजीनामा देत असल्याचं ट्वीट केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या: