Jayant Patil : लोकसभेची निवडणूक महाराष्ट्रातील जनतेनं हाती घेतली आहे, जनतेला देशातील संविधान वाचवायचे असून जनता भारतीय जनता पक्षाच्या विरोधात काम करत असल्याची खोचक टीका शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. महागाई, बेरोजगारीमुळे जनता प्रचंड त्रासली असल्याचे जयंत पाटील म्हणाले. 


32 ते 35 जागा महाविकास आघाडीच्या निवडून येतील


जयंत पाटील यांनी सांगितले की, जीएसटीची आकारणी चुकीच्या पद्धतीने केली जाते. आंतरराष्ट्रीय किमती कमी असताना गॅस पेट्रोल डिझेल महाग झाले आहेत. त्यामुळे जनता भारतीय जनता पक्षाच्या विरोधात काम करत असून 32 ते 35 जागा महाविकास आघाडीच्या निवडून येतील, असा दावा जयंत पाटील यांनी केला.


तर परत येणाऱ्या आमदारांचा विचार केला जाईल 


जयंत पाटील यांनी अजित पवार गटाच्या आमदारांवरही भाष्य केले. ते म्हणाले की, आता पुलाखालून बरेचसे पाणी वाहून गेलं आहे. त्यामुळे नवीन चेहरे पुढे आले आहेतअसून तरुण मंडळी चांगलं काम करत आहे. ज्या मतदारसंघात अजिबात पर्याय नसेल तर परत येणाऱ्या आमदारांचा विचार केला जाईल. तरुणांना संधी देण्यासाठी शरद पवार हे नेहमीच आग्रही असल्याचे त्यांनी सांगितले. 


सहा महिन्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा तोटा


जयंत पाटील यांनी सांगितले की, नगर, नाशिक, जळगाव पुणे सह सर्वच कांदा उत्पादक क्षेत्रात कांद्याचा ज्वलंत प्रश्न आहे. केंद्र सरकारच्या धोरणांमुळे मागील सहा महिन्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा तोटा झाला आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी काही, तरी आश्वासन देतील त्याला अर्थ नाही. पूर्ण वेळ निघून गेली असून लाल कांदा उत्पादकांचे मोठे नुकसान झालं आहे. केंद्र सरकारची धोरणे शेतकरी विरोधी असल्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होईल, अशी आश्वासने दिली. मात्र, खर्च दुप्पट झाल्याची टीका त्यांनी केली. 


लोकसभा निवडणूकीत पैशांचा प्रचंड प्रमाणात पाऊस 


जयंत पाटील यांनी निवडणुकीत होत असलेल्या पैशांच्या पावसावरून जोरदार टीका केली. त्यांनी सांगितले की, लोकसभा निवडणूकीत पैशांचा प्रचंड प्रमाणात पाऊस पडत आहे. शेवटच्या दोन-तीन दिवसात सर्व प्रकारचा अवलंब केला जात आहे. मात्र, निवडणूक आयोग डोळे बंद करून बसत आहे. पोलिस प्रशासन तक्रार केल्यानंतर जात नाही, अशा प्रकारचा अनुभव येत आहे. कोणतीही कारवाई होत नसल्याची आमची प्रमुख तक्रार असल्याचे ते म्हणाले. बीड परळीमध्ये रिपोलची मागणी आमच्या उमेदवाराने केली. मात्र, बीडचे जिल्हा प्रशासन कुठली कारवाई करत नसल्याचा आरोप त्यांनी केला. 


इतर महत्वाच्या बातम्या