एक्स्प्लोर

'हिरोईन' शब्दाचा अर्थ कर्तबगार महिला; बबनराव लोणीकरांची सारवासारव

महिला तहसीलदार यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर भाजप नेते बबनराव लोणीकरांची सारवासारव केली आहे. हिरोईय या शब्दाचा अर्थ कर्तबगार महिला असा होतो, असं स्पष्टीकरण लोणीकर यांनी दिलं आहे.

मुंबई : माजी मंत्री आणि भाजप नेते बबनराव लोणीकर यांनी महिला तहसीलदाराबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावर सारवासारव केली आहे. हिरोईन शब्दाचा मराठीत नायिका असा होतो आणि नायिका म्हणजे कर्तबगार महिला, असं मला म्हणायचं होतं. तहसीलदारांबद्दल हिरोईन हा शब्द आदराने वापरला. विरोधकांनी हिरोईन शब्दाचं भांडवलं करु नये, असं बबनराव लोणीकर यांनी म्हटलं आहे.

शेतकऱ्यांना सरकारने हेक्टरी 25 हजार रुपये मदत देण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र सरकारकडून अद्याप शेतकऱ्यांना कोणतीही मदत मिळालेलं नाही. यासाठी मोर्चा काढण्यासंदर्भात मी बोलत होतो. बोलताना मी तहसीलदार यांचा हिरोईन असा उल्लेख केला, याचा अर्थ वाईट होतो असं होत नाही. हिरोईनचा अर्थ नायिका म्हणजे कर्तबगार महिला असा होतो. विरोधकांना विनंती आहे की हिरोईन शब्दाचा अपमान करु नका. मी हिरोईन हा शब्द चांगल्या अर्थाने वापरला होता आणि तो शब्द वाईटही नाही, असं बबनराव लोणीकर यांनी म्हटलं.

काय म्हणाले बबनराव लोणीकर?

सरकारकडून 25 हजार रुपये अनुदान पाहिजे असेल तर मराठवाड्यातला सगळ्यात मोठा मोर्चा परतूरला करायचा का तुम्ही ठरवा. सगळ्या सरपंचांनी आपाआपल्या गावातून गाड्या आणल्या पाहिजेत. जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य सगळ्यांनी ताकद लावली तर महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा मोर्चा येथे होऊ शकतो. आणि अधिवेशनाच्या आधी जर मोर्चा झाला, तर 25 हजार लोक आणेल, 50 हजार लोक आणेल, तुम्ही सांगा देवेंद्र फडणवीस यांना आणू, तुम्ही सांगा चंद्रकांतदादा पाटलांना आणू. तुम्ही सांगा सुधीर भाऊंना आणू. कुणाला आणायचं तुम्हाला वाटलं तर मग एखादी हिरोईन आणायची तर हिरोईन आणू आणि नाही जर कोणी भेटलं तर तहसीलदार मॅडम हिरोईन आहेतच, त्या निवेदन घ्यायला येतील, असं बबनराव लोणीकरांनी म्हटलं.

विरोधकांची टीका

भाजपची संस्कृती रसातळाला गेली आहे. बबनराव लोणीकरांचं वक्तव्य आक्षेपार्ह आहे, मी त्यांच्या वक्तव्याचा निषेध करते, असं राष्ट्रवादीच्या आमदार विद्या चव्हाण यांनी म्हटलं आहे. मोर्चाला गर्दी जमवण्यासाठी हिरोईन आणा आणि मोर्चा मोठा करा, असं लोणीकरांनी म्हटलं तेही चुकीचंच आहे. शेतकऱ्यांसाठीच्या मोर्चाचं उद्दीष्ट काय आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे असतील तर मोर्चाला शेतकरी आणा. मात्र भाजपच्या मोर्चात शेतकरी सहभागी होणार नाहीत, म्हणून त्यांच्याकडून असे प्रयत्न केले जातात. एका महिलेबाबत असं वक्तव्य विनयभंगाचा गुन्हा आहे. महिला अधिकाऱ्यांचा सन्मान करणं गरजेचं असून असं वक्तव्य लज्जास्पद आहे, असं विद्या चव्हाण यांनी म्हटलं.

एखाद्या महिलेबद्दल असं वक्तव्य करणं निषेधार्थ आहे. बबनराव लोणीकरांनी याबाबत माफी मागावी. तसेच कायद्याच्या चौकटीत राहून लोणीकरांवर काय कारवाई करता येईल, याची माहिती आम्ही घेऊ, असं तहसीलदार संघटनेचे अध्यक्ष सुरेश बगळे यांनी म्हटलं आहे.

शेतकऱ्यांच्या मोर्चात हिरोईन आणू, भाजप नेते बबनराव लोणीकरांचं आक्षेपार्ह वक्तव्य

महत्त्वाच्या बातम्या

Sachin Sanap Pune Election : पुणे पदवीधरवरून शिवसेनेत नाराजी; दुसरीकडे शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवार सचिन सानपांची मोठी राजकीय लॉबी; सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटीवर प्रतिक्रिया, म्हणाले 'मला सांगितलं गेलंय की...'
पुणे पदवीधरवरून शिवसेनेत नाराजी; दुसरीकडे शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवार सचिन सानपांची मोठी राजकीय लॉबी; सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटीवर प्रतिक्रिया, म्हणाले 'मला सांगितलं गेलंय की...'
Vivekanand Patil On Raj Thackeray: पुण्यातील MPSC चं आंदोलन स्थगित, राज ठाकरेंनी केला विवेकानंद पाटीलला फोन, म्हणाले...
पुण्यातील MPSC चं आंदोलन स्थगित, राज ठाकरेंनी केला विवेकानंद पाटीलला फोन, म्हणाले...
Chandrashekhar Bawankule : अनधिकृत बांधकामांच्या दस्त नोंदणीवर बंदी; बावनकुळेंचा मोठा निर्णय, आता अर्जासोबतच्या कागदपत्रांची 7 मुद्द्यांवर होणार क्रॉस चेकिंग
अनधिकृत बांधकामांच्या दस्त नोंदणीवर बंदी; बावनकुळेंचा मोठा निर्णय, आता अर्जासोबतच्या कागदपत्रांची 7 मुद्द्यांवर होणार क्रॉस चेकिंग
Chhatrapati Sambhajinagar Crime News: शासकीय नोकरीची थाप मारून लग्न, चार महिन्यांतच संजनाने जीवन संपवलं; माहेरच्यांना वेगळाचं संशय, छत्रपती संभाजीनगर हादरलं!
शासकीय नोकरीची थाप मारून लग्न, चार महिन्यांतच संजनाने जीवन संपवलं; माहेरच्यांना वेगळाचं संशय, छत्रपती संभाजीनगर हादरलं!

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sachin Sanap Pune Election : पुणे पदवीधरवरून शिवसेनेत नाराजी; दुसरीकडे शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवार सचिन सानपांची मोठी राजकीय लॉबी; सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटीवर प्रतिक्रिया, म्हणाले 'मला सांगितलं गेलंय की...'
पुणे पदवीधरवरून शिवसेनेत नाराजी; दुसरीकडे शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवार सचिन सानपांची मोठी राजकीय लॉबी; सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटीवर प्रतिक्रिया, म्हणाले 'मला सांगितलं गेलंय की...'
Chandrashekhar Bawankule : अनधिकृत बांधकामांच्या दस्त नोंदणीवर बंदी; बावनकुळेंचा मोठा निर्णय, आता अर्जासोबतच्या कागदपत्रांची 7 मुद्द्यांवर होणार क्रॉस चेकिंग
अनधिकृत बांधकामांच्या दस्त नोंदणीवर बंदी; बावनकुळेंचा मोठा निर्णय, आता अर्जासोबतच्या कागदपत्रांची 7 मुद्द्यांवर होणार क्रॉस चेकिंग
Maval News: मावळच्या इंद्रायणीवर दुष्काळाचं सावट, भात किलोमागे 20 रुपयांनी महागणार! एल निनोच्या संकटाने शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांच्याही चिंता वाढली
मावळच्या इंद्रायणीवर दुष्काळाचं सावट, भात किलोमागे 20 रुपयांनी महागणार! एल निनोच्या संकटाने शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांच्याही चिंता वाढली
Imperial Heritage Nalasopara Fire: घरात आग लागली, चारजण इमारतीच्या 14 मजल्यावर 45 मिनिटं लटकले, नालासोपाऱ्यातील थरकाप उडवणारा VIDEO
घरात आग लागली, चारजण इमारतीच्या 14 मजल्यावर 45 मिनिटं लटकले, नालासोपाऱ्यातील थरकाप उडवणारा VIDEO
Maharashtra Vidhan Parishad Election: पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडावी लागल्याने शिवसेनेत नाराजी; पदाधिकाऱ्यांनी घेतली एकनाथ शिंदेंनी भेट, बैठकीत नेमकं काय घडलं?
पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडावी लागल्याने शिवसेनेत नाराजी; पदाधिकाऱ्यांनी घेतली एकनाथ शिंदेंनी भेट, बैठकीत नेमकं काय घडलं?
Emraan Hashmi Gunmaaster G9 Stunt SUV Flips Viral Video: इमरान हाश्मीची SUV हवेतच पलटली, गरगर गिरक्या घेऊन व्हॅनवर आदळली; VIRAL VIDEO नं काळजाचा ठोका चुकला, लाडका अभिनेता सुखरुप तर आहे ना? चाहत्यांना चिंता
इमरान हाश्मीची SUV हवेतच पलटली, गरगर गिरक्या घेऊन व्हॅनवर आदळली; VIRAL VIDEO नं काळजाचा ठोका चुकला, लाडका अभिनेता सुखरुप तर आहे ना? चाहत्यांना चिंता
PHOTO : MPSC आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील कोल्हापुरात, मूळ गावी जंगी स्वागत
MPSC आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील कोल्हापुरात, मूळ गावी जंगी स्वागत
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
Embed widget