एक्स्प्लोर

वर्षाचे 365 दिवस चालणारी हिंगोलीतली आदर्श शाळा

हिंगोली : एकीकडे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये दिल्या जाणाऱ्या शिक्षणाचा दर्जा घसरत जात असल्याचा आरोप होत असताना, दुसरीकडे मात्र हिंगोली जिल्ह्यातील गढाळामधील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेने शिक्षणाच्या बाबतीत एक आगळा वेगळा आदर्श निर्माण केला आहे. वर्षाचे 365 दिवस चालणारी हिंगोलीतली आदर्श शाळा सध्या सर्व शाळांना उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या आहेत. पण गाढळच्या शाळेत मात्र चक्क शाळा सुरु आहे. ही आहे हिंगोली जिल्ह्यातील औंढा तालुक्यात येणारी गढाळाची जिल्हा प्राथमिक शाळा. आपल्याला प्रश्न पडला असेल की, इतर शाळांसारखीच असणाऱ्या या शाळेचे वैशिष्ट्य काय? वर वर पाहता ही शाळा इतर शाळांसारखीच वाटते. प्राथमिक शाळा असल्याने या शाळेत 5 वर्ग आहेत आणि दोन शिक्षक.   365 दिवस चालणारी शाळा   काही वर्षांपूर्वी ही शाळा इतर शाळांसारखीच होती. मात्र या शाळेत उत्तम वानखेडे आणि सिद्धेश्वर रणखांब हे दोन शिक्षक आल्यापासून या शाळेचे चित्रच बदलले आहे. या शाळेला कधीच सुट्टी नसते, वर्षाच्या 365 दिवस चालणारी ही कदाचित महाराष्ट्रातील एकमेव शाळा असेल. सध्या इतर शाळांना उन्हाळ्याच्या सुट्या लागलेल्या असताना मात्र ही शाळा सुरु असून, या शाळेत अभ्यास घेतला जात आहे. वर्षाचे 365 दिवस चालणारी हिंगोलीतली आदर्श शाळा विशेष म्हणजे दिवसाचे 24 तास शाळा सुरु असून, विद्यार्थ्यांचे पालक बाहेर गावी कामानिमित्त गेल्यावर विद्यार्थ्यांना शाळेत निवासी व्यवस्था शिक्षक आणि गावकऱ्यांतर्फे करण्यात आली आहे.   सध्या उन्हाळ्यातही शाळा सुरु असून, पुढील वर्गात गेलेल्या विद्यार्थ्यांचा अभ्यास आताच घेण्यात येत आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांना सराव होईल. छोट्याशा शाळेच्या प्रत्येक गोष्टीचा वापर मुलांना शिक्षणासाठी करण्यात आला आहे. बाहेर वऱ्हांड्याचा वापर विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी केला जातो. वर्षाचे 365 दिवस चालणारी हिंगोलीतली आदर्श शाळा हायटेक शाळा   शाळा जिल्हा परिषदेची असली, तरी पूर्णपणे हायटेक आहे. विद्यार्थांना पुस्तकामधून शिकवलेले विषय चांगल्या प्रकारे समजण्यासाठी त्यांची चित्रफित टीव्हीच्या माध्यमातून दाखवली जाते. शाळेतला लहान विद्यार्थीसुद्धा संगणक अगदी सहजपणे चालवतो. संगणकाच्या माध्यमातून अनेक विषयांचा अभ्यास घेतला जातो.   गावकऱ्यांचीही मदत   शाळेतील डेस्कचा वापरही गणित लिहून ज्ञान वाढवण्यासाठी केला गेला आहे. विशेष म्हणजे उन्हाळ्यात विद्यार्थ्यांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून गावकऱ्यांनी वर्गणी गोळा करून, वर्गात कुलर बसवले आहेत. कोणत्याही मंदिरात साप्ताह, कीर्तन, आरती होत असते. मात्र गढाळा येथील मारुती मंदिरात या शाळेचे दोन वर्ग भरवले जातात. शाळेला दोनच खोल्या असल्यामुळे जागा अपुरी पडत आहे. गावकऱ्यांनी सप्ताह आणि कीर्तन बंद करून ज्ञानदानाचा या उत्तम कामासाठी मंदिर वापरायला दिले आहे. शिक्षक आणि गावकर्यांच्या प्रयत्नाने ही शाळा आदर्श झाली आहे. नावाजलेल्या शाळांच्या विद्यार्थी नवोदय शाळेची परीक्षा पास होऊ शकत नाही. तिथे या शाळेचे अनेक विद्यार्थ्यांनी  नवोदय विद्यालयात प्रवेश मिळविला आहे.   खेळातील सहभागासाठी प्रोत्साहन   शारीरिक क्षमता असूनही अनेक विद्यार्थी योग्य मार्दर्शन आणि प्रोत्साहन अभावी मागे पडतात. या शाळेत फक्त शिक्षणावर भर दिला जात नाही, तर विद्यार्थ्यांच्या शारीरीक विकासाकडेही तितकेच लक्ष दिले जाते. सकाळी 4 वाजल्यापासून शिक्षक विद्यार्थ्यांना मैदानावर घेऊन जातात आणि व्यायाम, प्राणायाम घेण्यात येते. याचे फलित म्हणजे आतापर्यंत या दुर्गम शाळेचे अनेक विद्यार्थी क्रीडा प्रबोधिनी मध्ये लागले आहेत.   अवघ्या 350 वस्तीचं असलेल्या या गावात प्राथमिक शाळेत 84 विद्यार्थी असून, यापैकी 32 विद्यार्थी बाहेर गावचे  आहेत. यामध्ये अनेक पालकांनी इंग्रजी शाळा सोडून त्यांच्या पालकांना या शाळेत प्रवेश घेतला आहे. शाळेत 365 दिवस विद्यार्थ्यासाठी पोषण आहार शिजवला जातो.   इंग्रजी शाळेला मात देणाऱ्या गढाळासारख्या शाळा जात इतरत्र झाल्या, तर इंग्रजी शाळा ओस पडल्या शिवाय राहणार नाही. ही शाळा यशस्वीरित्य करण्यात शिक्षकांचे अथक परिश्रम सोबत गावकऱ्यांची त्यांना लाभलेली साथ आहे.

महत्त्वाच्या बातम्या

एका बाजुला दुष्काळ, दुसऱ्या बाजुला विजेचा लंपडाव, लोड शेडिंगमुळं बळीराजा त्रस्त, पिकं जगवण्यासाठी धडपड, Abp माझा थेट बांधावर
एका बाजुला दुष्काळ, दुसऱ्या बाजुला विजेचा लंपडाव, लोड शेडिंगमुळं बळीराजा त्रस्त, पिकं जगवण्यासाठी धडपड, Abp माझा थेट बांधावर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 सप्टेंबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 सप्टेंबर 2026 | शुक्रवार
Todays Breaking News Updates: तामिळनाडूनं मानसिकता बदलावी आणि शाळांमध्ये हिंदी भाषा सुरु करावी; सुप्रीम कोर्टाचा सल्ला
Todays Breaking News Updates: तामिळनाडूनं मानसिकता बदलावी आणि शाळांमध्ये हिंदी भाषा सुरु करावी; सुप्रीम कोर्टाचा सल्ला
Amol Khune On Manoj Jarange: कोणी रसद पुरवली? कोणी पैसे दिले? हजारो कोटीची प्रॉपर्टी जमवली; शिष्टमंडळाच्या हातापाय पडला...; मनोज जरांगेंच्या जुन्या सहकाऱ्याने सगळंच काढलं
कोणी रसद पुरवली? कोणी पैसे दिले? हजारो कोटीची प्रॉपर्टी जमवली; शिष्टमंडळाच्या हातापाय पडला...; मनोज जरांगेंच्या जुन्या सहकाऱ्याने सगळंच काढलं

व्हिडीओ

Nithari Kand Surendra Koli : 'निठारी'तून मुक्तता सुटकेनंतर शेवट! | Special Report ABP Majha
Mamata Banerjee TMC News : ठाकरे आणि पवार आता ममताही बेजार? | Special Report ABP Majha
Manoj Jarange Attack : मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं, आरोपांनी घेरलं Special Report
El Nino : दुष्काळामुळे दैना, शरद पवारांच्या सूचना Special Report
Sharad Pawar Letter to CM Devendra Fadnavis: 'महाराष्ट्रात तत्काळ दुष्काळ जाहीर करा'; शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raigad Crime News: 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 5 जणांकडून वारंवार अत्याचार; रायगडमधील थरकाप उडवणारी घटना
17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 5 जणांकडून वारंवार अत्याचार; रायगडमधील थरकाप उडवणारी घटना
Home Loan: घर खरेदी करण्यासाठी गृहकर्ज घेण्याचा विचार करताय, सर्वात कमी व्याज दर कोणत्या बँकेचा?   
घर खरेदी करण्यासाठी गृहकर्ज घेण्याचा विचार करताय, सर्वात कमी व्याज दर कोणत्या बँकेचा?   
Ravindra Chavan : दिशा सालियन मृत्यू प्रकरणात पुराव्यांशिवाय बोलू नका, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी टोचले कान
दिशा सालियन मृत्यू प्रकरणात पुराव्यांशिवाय बोलू नका, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी टोचले कान
Mamata Banerjee: नवं नाव आणि चिन्ह मिळालं पण नंदिग्रामच्या उमेदवारानं माघार घेतली, अखेर ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय
नवं नाव आणि चिन्ह मिळालं पण नंदिग्रामच्या उमेदवारानं माघार घेतली, अखेर ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय
Manoj Jarange Protest: शब्द बदलले की निर्णय? आश्वासनांपलीकडे प्रत्यक्षात काय बदललं? 20 दिवसांच्या उपोषणातून मनोज जरांगेंना नेमकं काय मिळालं? नेमका कुठे काय बदल झाला? वाचा सविस्तर
शब्द बदलले की निर्णय? आश्वासनांपलीकडे प्रत्यक्षात काय बदललं? 20 दिवसांच्या उपोषणातून मनोज जरांगेंना नेमकं काय मिळालं? नेमका कुठे काय बदल झाला? वाचा सविस्तर
Mahendra Dalvi : बाप्पाचं दर्शन घेणं चुकीचं नाही, आमचा संघर्ष, त्यामागचा प्रवास पाहता गोगावलेंची भूमिका चुकली, महेंद्र दळवींची गोगावले-तटकरे भेटीवरुन नाराजी
तटकरेंकडे सगळेच लोक संशयानं बघतात, भरतशेठनं त्यांच्या घरी जाणं टाळलं पाहिजे होतं, महेंद्र दळवींची नाराजी समोर
Delhi Crime News: मित्राला भेटायला गेली, त्याच्यासह 4 मित्रांनी तिच्यासोबत नको ते केलं, नंतर 6 पेक्षा जास्त वेळा भोसकलं, शेतात पाला अन् मातीनं झाकलं, दिल्लीत अल्पवयीन मुलीसोबत हादरवणारं कृत्य
मित्राला भेटायला गेली, त्याच्यासह 4 मित्रांनी तिच्यासोबत नको ते केलं, नंतर 6 पेक्षा जास्त वेळा भोसकलं, शेतात पाला अन् मातीनं झाकलं, दिल्लीत अल्पवयीन मुलीसोबत हादरवणारं कृत्य
Thane Crime News: ठाण्यात तीन भावांनी वेगवेगळ्या ठिकाणी बहिणीसोबत नको ते केलं, मारण्याची धमकीही दिली, 6 महिन्यांनंतर तिनं आईला आपबिती सांगितली अन्...
ठाण्यात तीन भावांनी वेगवेगळ्या ठिकाणी बहिणीसोबत नको ते केलं, मारण्याची धमकीही दिली, 6 महिन्यांनंतर तिनं आईला आपबिती सांगितली अन्...
Embed widget