एक्स्प्लोर

निवडणुकीत नात्यागोत्यांना तिलांजली, आईविरोधात मुलाचा शड्डू

जळगाव : राजकारणाच्या आखाड्यात नातीगोती नेहमीच चर्चेची राहिली आहेत. कधी नेत्यांच्या कुटुंबीयांना उमेदवारी देण्यावरुन, तर कधी घरातल्याच व्यक्ती एकमेकांविरुद्ध उभे ठाकल्यावरुन. जळगाव जिल्ह्यात आईविरोधात मुलानेच शड्डू ठोकल्याचा प्रकार समोर आला आहे. जळगाव तालुक्यात म्हसावद बोरनार गटात आई लीलाबाई सोनवणे यांच्या विरुद्ध मुलगा पवन सोनावणे याने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आई भाजपकडून, तर मुलगा शिवसेनेकडून आखाड्यात उतरला आहे. त्यामुळे आई विरुद्ध मुलगा, शिवसेना विरुद्ध भाजप अशी रंगतदार लढत जिल्ह्याच्या दृष्टीने चर्चेची राहणार आहे. दिवंगत शिवसेना नेते आणि सुरेश जैन यांचे कट्टर समर्थक कै भिला गोटू सोनावणे यांचे जळगाव तालुक्यात म्हसावद बोरनार गटात चांगलेच वर्चस्व होते. त्यांनी आपल्या कर्तृत्वाने या मतदारसंघात वजन निर्माण केले होते आणि त्याच आधारावर अनेक वर्ष ते या ठिकाणी निवडून येत होते. गेल्या वेळी हा गट महिलांसाठी राखीव झाल्याने त्यांच्या पत्नी लीलाबाई सोनावणे तिथून उभ्या राहिल्या आणि निवडूनही आल्या होत्या. दरम्यानच्या काळात दीर्घ आजाराने भिला गोटू सोनवणे यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर ही पहिलीच जिल्हा परिषद निवडणूक होत आहे. त्यामुळे त्यांच्या जागेचा वारसदार कोण असा प्रश्न निर्माण झाला. लीलाबाई या भिला यांच्या पहिल्या पत्नी, तर पवन हे भिला यांच्या दुसऱ्या पत्नीचे चिरंजीव आहेत. पवन आणि लीलाबाई सोनावणे या दोघांनी शिवसेनेकडे आपली उमेदवारी मागितली होती, मात्र सेनेने पवन यांना उमेदवारी देऊ केल्याने लीलाबाई यांनी भाजपमध्ये प्रवेश करत आपली उमेदवारी मिळवली. पवन जर भाजपमध्ये येणार असेल, तर आपण आपली उमेदवारी मागे घेऊ असंही त्यांनी पवनला सांगितलं होतं, पवनला आपल्याविरोधात उभे करुन आमच्या घरातील राजकारण संपवण्याचा विरोधकांचा डाव असल्याचं त्या सांगतात. मात्र शिवसेनेमुळे आपल्या वडिलांना या ठिकाणी निवडून येता आल्याने त्यांच्या इच्छेविरुद्ध आपण शिवसेना सोडणार नसल्याची भूमिका पवन यांनी घेतली.

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 जुलै 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 जुलै 2026 | शुक्रवार
तुमच्या हातात बंदुका, लाठ्या असतील, पण आमच्या हातात तिरंगा; उद्धव ठाकरेंनी तिरंगा मार्चमधून ललकारलं, शिवाजी पार्कवर विद्यार्थ्यांचा जनसागर, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी
तुमच्या हातात बंदुका, लाठ्या असतील, पण आमच्या हातात तिरंगा; उद्धव ठाकरेंनी तिरंगा मार्चमधून ललकारलं, शिवाजी पार्कवर विद्यार्थ्यांचा जनसागर, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी
महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, हरयाणा ते बंगालपर्यंत; अवघ्या देशभरात विद्यार्थ्यांचा नीट पेपरफुटीच्या निषेधार्थ रस्त्यावर आक्रोशाचा वणवा, वकील सुद्धा आंदोलनात
महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, हरयाणा ते बंगालपर्यंत; अवघ्या देशभरात विद्यार्थ्यांचा नीट पेपरफुटीच्या निषेधार्थ रस्त्यावर आक्रोशाचा वणवा, वकील सुद्धा आंदोलनात
Neet Paper Leak: केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी, पेपरफुटी संदर्भात नवा कायदा, पुढील आठवड्यात विधेयक; 10 वर्षे कारावास, 10 कोटी रुपये दंड
केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी, पेपरफुटी संदर्भात नवा कायदा, पुढील आठवड्यात विधेयक; 10 वर्षे कारावास, 10 कोटी रुपये दंड

व्हिडीओ

Wangchuk Hunger Strike Special Report : उपोषणाची माघार, आंदोलनाचा एल्गार, उपोषण का सोडलं?
CJP Special Report : मीटिंगमध्ये काय ठरलं? राजीनाम्यावरुन अडलं, कॉक्रोच जनता पार्टीत तासभर चर्चा
Abhijeet Dipke PC : मला अटक होऊ शकते पण तुम्ही, अभिजीत दिपकेचं विद्यार्थ्यांना मोठं आवाहन
Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET Paper Leak: सीजेपीच्या नेतृत्त्वात विद्यार्थ्यांचं राजधानीत आंदोलन, NTA कडून 47 अधिकारी बडतर्फ, केंद्र सरकारचं आणखी एक पाऊल  
सीजेपी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी आग्रही, NTA कडून 47 अधिकारी बडतर्फ, केंद्र सरकारचं आणखी एक पाऊल  
Narendra Modi : इन्स्टाग्रामवर सक्रिय राहा रिल्स पोस्ट करा, मोदींचा मंत्र्यांना सल्ला; नवा व्हिडिओ शेअर करत म्हणाले
इन्स्टाग्रामवर सक्रिय राहा रिल्स पोस्ट करा, मोदींचा मंत्र्यांना सल्ला;नवा व्हिडिओ शेअर 
सरन्यायाधीशांवर महाभियोग चालवाव, रोहित पवारांची मागणी; जंतरमंतरवर अभिजीत दीपकेंचीही भेट घेतली
सरन्यायाधीशांवर महाभियोग चालवाव, रोहित पवारांची मागणी; जंतरमंतरवर अभिजीत दीपकेंचीही भेट घेतली
क्रूड ऑइल 100 डॉलरच्या पार गेल्यानं निफ्टी 50 सलग 5व्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 332 अंकांनी कोसळला
क्रूड ऑइल 100 डॉलरच्या पार गेल्यानं निफ्टी 50 सलग 5व्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 332 अंकांनी कोसळला
Cricket Schedule 2027: वनडे वर्ल्ड कप, आयपीएल, WTC फायनलचा थरार, बॉर्डर गावस्कर ट्रॉफीनं सुरुवात,पुढील वर्ष क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार
वनडे वर्ल्ड कप, आयपीएल, WTC फायनलचा थरार, 2027 ठरणार क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार
मोठी बातमी! बनावट शालार्थ आयडी घोटाळा, 190 कोटींची फसवणूक; माजी शिक्षणाधिकाऱ्याला धुळ्यातून अटक
मोठी बातमी! बनावट शालार्थ आयडी घोटाळा, 190 कोटींची फसवणूक; माजी शिक्षणाधिकाऱ्याला धुळ्यातून अटक
Mhada Lottery 2026 : नाशिकमध्ये घर खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज, म्हाडा नाशिक मंडळातर्फे 744 सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर
म्हाडा नाशिक मंडळातर्फे 744 सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर; ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेला प्रारंभ
जळगावात विचित्र तिहेरी अपघात; आयशर अन् एसटीचालक जखमी, बसमधील प्रवासी थोडक्यात बचावले
जळगावात विचित्र तिहेरी अपघात; आयशर अन् एसटीचालक जखमी, बसमधील प्रवासी थोडक्यात बचावले
Embed widget