जळगाव : जळगावात आयशर ट्रक आणि रिक्षाचा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये एकाच कुटुंबातील सहा जणांना प्राण गमवावे लागले आहेत.


आयशर ट्रक आणि रिक्षाची धडक होऊन झालेल्या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला. सात पैकी सहा जण चव्हाण कुटुंबातील सदस्य आहेत. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातल्या रांजणगाव फाट्याजवळ हा अपघात घडला. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली.

अपघातात सात जणांचा मृत्यू झाला, तर दोघं गंभीर जखमी आहेत. या अपघातामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावर बोधरे गावातील चव्हाण कुटुंबावर शोककळा पसरली आहे.