मुंबई : राज्यातील दुसऱ्या टप्प्यातील ग्रामपंचायत निवडणुकांची आज मतमोजणी होणार आहे. कालच (सोमवार) या निवडणुकीचं मतदान पार पडलं. जवळपास 81 टक्के मतदानाची नोंद कालच्या मतदानात झाली.


काल 18 जिल्ह्यातील जवळपास 4 हजार 119 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासह सदस्यपदासाठी मतदान झालं. यातील साधारण 380 ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत.

तर काही ठिकाणी विविध कारणांमुळे काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे आज 3 हजार 700 ग्रामपंचायतींचा निकाल लागणार आहे. त्यामुळे आता दिवाळीआधी कोण दिवाळी साजरी करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिलं आहे.

मतदान झालेल्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या

  1. ठाणे- 33

  2. पालघर- 50

  3. रायगड- 162

  4. रत्नागिरी- 154

  5. सिंधुदुर्ग- 293

  6. पुणे- 168

  7. सोलापूर- 181

  8. सातारा- 256

  9. सांगाली- 425

  10. कोल्हापूर- 435

  11. उस्मानाबाद- 158

  12. अमरावती- 250

  13. नागपूर- 237

  14. वर्धा- 86

  15. चंद्रपूर- 52

  16. भंडारा- 361

  17. गोंदिया- 341

  18. गडचिरोली- 24


 

एकूण- 3,666