मुख्यमंत्र्यांच्या दत्तक गावात काँग्रेस-राष्ट्रवादी पुरस्कृत सरपंच
एबीपी माझा वेब टीम | 17 Oct 2017 10:38 AM (IST)
एकूण नऊ जागांपैकी पाच जागा भाजपनं जिंकल्या, मात्र सरपंचपद भाजपच्या हातून निसटलं आहे.
नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना होमग्राऊण्डवरच धक्का बसला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत फडणवीसांनी दत्तक घेतलेल्या गावातच काँग्रेस-राष्ट्रवादी पुरस्कृत महिला सरपंचपदी विराजमान होत आहे. नागपुरातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीमध्ये मुख्यमंत्र्यांना झटका मिळाला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या फेटरी गावात ग्रामपंचायत निवडणूक झाली. राष्ट्रवादीनं पुरस्कृत केलेल्या धनश्री ढोमणे सरपंच झाल्या आहेत.