एक्स्प्लोर

काय म्हणता... केवळ दोन लाखात घर, फोल्ड करा अन् कुठेही घेऊन जा! जळगावमधील प्राध्यापकाच्या भन्नाट घराची चर्चा

Jalgaon News : सहज एका ठिकाणाहून दुसरीकडे घेऊन जाता येईल अशा प्रकारचं घर जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथील प्रा नितीन दांडेकर यांनी बनवले असून त्यांचं हे अनोखं घर जळगाव जिल्ह्यात चर्चेचा विषय बनले आहे.

Jalgaon News Update : आपलं स्वतःचं घर असावं असं प्रत्येकालाच वाटत असते. मात्र वाढत्या किमती मुळे प्रत्येकालाच ते घेणं शक्य होत नाही. सर्वसामान्य माणसाची ही अडचण लक्षात घेत अतिशय कमी खर्चात कुठेही घेऊन जाता येईल अस फोल्डिंगचे घर जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथील प्रा नितीन दांडेकर यांनी बनवलं असून या घराची संपूर्ण जळगाव जिल्ह्यात चर्चा आहे. 

प्रा नितीन दांडेकर हे मूळचे जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील आहेत. या ठिकाणी त्यांचं स्वतःच घर आहे. मात्र त्यांची नोकरी एरंडोल तालुक्यात असल्याने त्यांना पुन्हा एरंडोलमध्ये खूप खर्च करून घर  
नको होतं. याच दरम्यान ते एखाद्या घराचा शोध घेत असताना त्यांना नाशिक येथील त्यांचे मित्र अभियंता आणि वास्तुतज्ञ सारंग आणि वैशाली पाटील यांनी अतिशय कमी खर्चात तेही काम झाल्यावर सहजपणे कुठेही घेऊन जाता येईल असं घर होऊ शकतं असा सल्ला दिला.

प्रा नितीन दांडेकर यांना सुरुवातीला यावर विश्वास बसला नाही. मात्र सारंग पाटील यांनी त्यांना त्यांनी बनविलेल्या अनेक घरांच्या साईट दाखविल्या. नंतर प्रा दांडेकर यांना ते पटलं आणि त्यांनी त्याचं बुकिंग करून घेतलं. 

एरंडोल शहरात दांडेकर यांनी दहा बाय सोळा अशा स्वरूपाचं घर बनवून घेतलं आहे. तेगी केवळ एकाच आठवड्यात आणि केवळ दोन लाखांमध्ये सर्व सोई युक्त त्यांचं घर तयार झाल्याने प्रा दांडेकर आणि त्यांचं हे घर चांगलेच चर्चेत आहे.

या घराच्या फायद्याविषयी सांगताना प्रा नितीन दांडेकर सांगताना यांनी म्हटलं आहे की हे घर फ्री फॅब्रिकेट प्रकारातील घर आहे.मजबूत देखील आहे. अजूनपर्यंत कोणतीही अडचण आपल्याला आली नाही. चोरांनी ठरवलं तर कोणतंही घर चोर फोडू शकतात. तसंच हे घर देखील कटरने चोर फोडू शकतात, असंही ते म्हणाले.  सहाशे फूट जागेत त्यात एकशे साठ फुटांचं हे घर आहे.

त्यात सर्व सुविधा करण्यात आल्या आहेत. याला एक लाख नव्वद हजार रुपये खर्च आला आहे. एवढ्या कमी खर्चात एवढ्या सुविधा असलेले घर कुठेच मिळू शकणार नाही, असा त्यांचा दावा आहे. 

सर्वसामान्य जनतेला घर बांधकाम करण्यासाठी परवानग्यांसाठी फिरावे लागते. मजूर आणि कामावर आपला वेळ काढून लक्ष द्यावे लागते. त्यासाठी काही महिने खर्च करावे लागतात. या ठिकाणी मात्र यातील कोणतीच गोष्ट आपल्याला करावी लागली नसल्याने केवळ खर्चच वाचला असे नाही तर वेळ सुद्धा वाचला आहे, त्यामुळे या घरची किंमत येत्या दहा बारा वर्षात वसूल होणार आहे, असं प्रा दांडेकर सांगतात. 

सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे हे घर आपल्याला वाटेल त्या ठिकाणी फोल्डिंग करून घेऊन जाता येणार आणि किंवा त्याला उचलूनही घेऊन जाता येणार असल्याने माझ्यासाठी हे घर म्हणजे आनंद देणारे ठरले आहे, असं प्रा नितीन दांडेकरांनी म्हटलं आहे.  

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
Maharashtra Live News Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर
Maharashtra Live News Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर
Sanjay Raut on Abhijeet Dipke: अभिजीत दिपके हळूहळू परिपक्व होतील, संघर्षात हे सहन करावेच लागते; संजय राऊतांचा प्रेमाचा सल्ला
अभिजीत दिपके हळूहळू परिपक्व होतील, संघर्षात हे सहन करावेच लागते; संजय राऊतांचा प्रेमाचा सल्ला
Uddhav Thackeray: गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray: गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
Kolhapur Crime News: रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
Embed widget