एक्स्प्लोर

चार अल्पवयीन मुलांच्या हत्येने जळगाव हादरलं, कुऱ्हाडीने गळा चिरुन खून

जळगावात चार अल्पवयीन मुलांची निर्घृण हत्या करण्यात आली. अज्ञात मारेकऱ्याने चारही मुलांची कुऱ्हाडीने गळा चिरुन हत्या केली.

जळगाव : चार अल्पवयीन बालकांची कुऱ्हाडीने गळा चिरुन हत्या केल्याची घटना जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील बोरखेडा गावात घडली आहे. बोरखेडा शेत शिवारात भिलाला नावाचं सालं दारी करणार कुटुंब राहतं. दोन मुलं आणि दोन मुली असलेली चार भावंड घरी ठेऊन भिलाला दाम्पत्य गावाला गेले असता, रात्रीच्या सुमारास अज्ञात मारेकऱ्याने या चारही जणांची कुऱ्हाडीने गळा चिरुन हत्या केली. या हत्येमागील कारणाचा आणि आरोपींचा तपास पोलीस करत आहेत.

ही घटना काल (15 ऑक्टोबर) मध्यरात्री घडली असावी असा अंदाज वर्तवला जात आहे. मृत मुलं ही 8 ते 13 वर्षे वयोगटातील ही मुलं आहेत. या कुटुंबाचं शेतातच वास्तव्य होतं.

बोरगाव शिवारात शेख मुश्ताक यांचे शेत आहे. मयताब भिलाला अनेक वर्षांपासून शेख यांच्या शेतात पत्नी, दोन मुली आणि तीन मुलांसोबत राहतात. नातेवाईकांच्या दशक्रिया विधीसाठी भिलाला 15 ऑक्टोबर रोजी पत्नी आणि एका मुलासह मध्य प्रदेशात गेले होते. तर दोन मुलं आणि दोन मुली हे चौघेत घरी होते. आज (16 ऑक्टोबर) सकाळी शेख मुश्ताक शेतात आल्यावर त्यांना घर बंद दिसलं. त्यामुळे त्यांनी आवाज देत डोकावून पाहिलं असता, त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. घरात भिलाला यांची चारही मुले रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती. यानंतर शेख यांनी तातडीने रावेर पोलिसांना माहिती दिली. यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

या घटनेच्या तपासासाठी पोलिसांची विविध पथकं तैनात करण्यात आली आहे. तसंच श्वान पथकाही मदत घेतली जात आहे. याशिवाय गावकऱ्यांची चौकशी केली जात असून या कुटुंबाचं इतर कोणाशी वैर होतं का? याची माहितीही पोलीस घेत आहेत. दरम्यान आरोपी लवकरच पकडला जाईल, असा दावा पोलीस करत आहेत.

दरम्यान जळगावच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला या घटनेने हादरवलं आहे. या घटनेनंतर गावकऱ्यांमध्ये भीतीचं आणि संतापाचं वातावरण आहे. पोलिसांनी लवकरात लवकर या घटनेचा छडा लावून आरोपींना जेरबंद करावा, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालेल का याची तपासणी करु : गुलाबराव पाटील, पालकमंत्री ही घटना अतिशय घृणास्पद असून ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवता येते का याचीही तपासणी केली जाईल. तसंच उज्ज्वल निकम हे त्याच जिल्ह्यातील असल्याने त्यांच्याकडे यासंदर्भात काही मदत घेतली जाईल का याचा सरकार विचार करेल, अशी माहिती जळगावचे गुलाबराव पाटील यांनी दिली. तसंच पोलीस अधीक्षक आणि पोलीस यंत्रणा घटनास्थळी पोहोचली आहे. मी आज रात्री उशिरा किंवा उद्या सकाळी तिथे जाऊन भेट देणार आहे. विविध पथकं करुन पोलिसांना तपास करण्याची सूचना पोलिसांना दिली आहे, असंही त्यांनी सांगितलं.

Jalgaon Murder | जळगावात चार अल्पवयीन मुलांची कुऱ्हाडीने गळा चिरुन हत्या

महत्त्वाच्या बातम्या

जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
Vasai News: हातात एक वर्षाची चिमुकली, स्कूटीवरून प्रवास; वाऱ्याने केस विस्कटले, आई केस बांधत असतानाच अनर्थ घडला, वसईतील काळीज पिळवटून टाकणारी घटना
हातात एक वर्षाची चिमुकली, स्कूटीवरून प्रवास; वाऱ्याने केस विस्कटले, आई केस बांधत असतानाच अनर्थ घडला, वसईतील काळीज पिळवटून टाकणारी घटना

व्हिडीओ

Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Devendra Fadnavis: 'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
Embed widget