एक्स्प्लोर

श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात जळगावच्या सुपूत्राला वीरमरण

श्रीनगरमध्ये सुरक्षा दलाच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला. यात 2 जवानांना वीरमरण आलं असून यातील एकजण जळगावचा सुपूत्र आहे.

जळगाव : जम्मू काश्मीर मधील श्रीनगर येथे आज दुपारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात दोन जवान शहीद झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील पिंपळगाव येथील यश देशमुख हा जवान शहीद झाला आहे.

यश देशमुख गेल्या वर्षी प्यारा मिल्ट्रीमध्ये भरती झाला होता. गेल्या तीन महिन्यांपासून काश्मीरमध्ये त्याची नेमणूक करण्यात आली होती. यश देशमुख शहीद झाल्याचं वृत्त सैन्य दलाच्या वतीने यशच्या कुटुंबाला फोनद्वारे कळविण्यात आल्याची माहिती त्याच्या कुटुंबियांकडून देण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाकडून या घटनेला अधिकृत दुजोरा देण्यात आला आहे. शहीद यश दिगंबर देशमुख याचं पार्थिव शवविच्छेदनानंतर श्रीनगरहुन चंदीगड आणि औरंगाबाद मार्गे चाळीसगावला येणार असल्याची माहिती विभागाने कळविली आहे.

उद्या सायंकाळी अथवा परवा सकाळपर्यंत पार्थिव चाळीसगाव येथे पोहोचण्याची शक्यता आहे. शेतकरी कुटुंबातील असलेल्या यशच्या शहीद होण्याने त्याच्या पिंपळगावसह संपूर्ण जळगाव जिल्ह्यावर शोक कळा पसरली असल्याचं पाहायला मिळत आहे.

श्रीनगरजवळील एचएमटी भागात सुरक्षा दलाच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला

श्रीनगरजवळील एचएमटी भागात सुरक्षा दलाच्या ताफ्यावर तीन दहशतवाद्यांनी अचानक हल्ला झाला. या हल्ल्यात दोन जवान शहीद झाला असून तीन जवान जखमी झाले आहेत. जखमी जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून हल्लेखोरांना पकडण्यासाठी परिसराचा वेढा दिला आहे.

या हल्ल्याविषयी माहिती देताना पोलीस महानिरिक्षक म्हणाले, हल्लेखोर मारुती कारमध्ये आले होते. त्यांनी अचानक जवानांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. या हल्ल्यामागे जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा हात असल्याची शक्यता आहे. शोधमोहिम सुरू असून संध्याकाळपर्यंत या विषयी अधिक माहिती मिळेल. या हल्ल्यात आपले दोन जवान शहीद झाले आहे.

श्रीनगरमधील अतिरेकी हल्ल्यात महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण, जळगावच्या पिंपळगावचे यश देशमुख शहीद

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: कोल्हापुरातील बहुचर्चित गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान
Maharashtra Live News Updates: कोल्हापुरातील बहुचर्चित गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान
Congress: चंद्रशेखर बावनकुळेंच्या 'त्या' वक्तव्यावरून काँग्रेस आक्रमक; विजय वडेट्टीवार म्हणाले, SIT चौकशी लावून बघा तुमचे डोळे काढून गोट्या खेळू, यशोमती ठाकूर, हर्षवर्धन सपकाळांचाही घणाघात
चंद्रशेखर बावनकुळेंच्या 'त्या' वक्तव्यावरून काँग्रेस नेते आक्रमक; विजय वडेट्टीवार म्हणाले, SIT चौकशी लावून बघा तुमचे डोळे काढून गोट्या खेळू; यशोमती ठाकूर, हर्षवर्धन सपकाळांचाही घणाघात
Amravati Accident News: भीषण अपघात! अमरावतीत भरधाव हायड्रा क्रेनची 5 मजुरांना धडक; तिघांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर, यावली शहीद-अडगाव मार्गावरील घटना
भीषण अपघात! अमरावतीत भरधाव हायड्रा क्रेनची 5 मजुरांना धडक; तिघांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर, यावली शहीद-अडगाव मार्गावरील घटना
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: चिपळूण, सांगलीसह अनेक जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी; आता किती दिवस कोसळणार?
चिपळूण, सांगलीसह अनेक जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी; आता किती दिवस कोसळणार?

व्हिडीओ

Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha
SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: चिपळूण, सांगलीसह अनेक जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी; आता किती दिवस कोसळणार?
चिपळूण, सांगलीसह अनेक जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी; आता किती दिवस कोसळणार?
Kolkata Stampede Marathi News: कुठे पर्स, कुठे विखुरलेल्या चप्पल; दुर्गापूजा मंडपात चेंगराचेंगरी, 19 जणांचा मृत्यू, कोलकातामधील थरकाप उडवणारे 8 फोटो
कुठे पर्स, कुठे विखुरलेल्या चप्पल; दुर्गापूजा मंडपात चेंगराचेंगरी, 19 जणांचा मृत्यू, कोलकातामधील थरकाप उडवणारे 8 फोटो
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला संपवलं; घराकडे जात असताना प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला संपवलं; घराकडे जात असताना प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार
शिवसेना नेत्या शायना एनसींच्या मुलीचा साखरपुडा; राज ठाकरेंसह बॉलिवूडचा भाईजान उपस्थित, नव दाम्पत्यास शुभेच्छा
शिवसेना नेत्या शायना एनसींच्या मुलीचा साखरपुडा; राज ठाकरेंसह बॉलिवूडचा भाईजान उपस्थित, नव दाम्पत्यास शुभेच्छा
Uddhav Thackeray: मग दिल्लीत हजारो पोलिस दांडिया खेळायला आणलेत का? अशी राजवट गाडलीच पाहिजे आणि ती गाडण्यासाठीच आम्ही सगळे उभे आहोत; उद्धव ठाकरेंचं राजनाथ सिंहांना प्रत्युत्तर
मग दिल्लीत हजारो पोलिस दांडिया खेळायला आणलेत का? अशी राजवट गाडलीच पाहिजे आणि ती गाडण्यासाठीच आम्ही सगळे उभे आहोत; उद्धव ठाकरेंचं राजनाथ सिंहांना प्रत्युत्तर
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन कोणी कारवाया केल्यास निलंबन; FDA च्या अधिकाऱ्यांना मंत्री नरहरी झिरवाळांची वॉर्निंग
कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन कोणी कारवाया केल्यास निलंबन; FDA च्या अधिकाऱ्यांना मंत्री नरहरी झिरवाळांची वॉर्निंग
Embed widget