एक्स्प्लोर

वय वर्षे पाच, कोणताही प्रश्न विचारा, उत्तर मिळवा

सोलापूर : जगातील देशांची नावे, त्यांच्या राजधान्या, त्यांचे क्षेत्रफळ, नद्या, विविध वैशिष्ट्य यांची माहिती वर्षानुवर्षे अभ्यास करुणही लक्षात राहणार नाही. मात्र सोलापूर जिल्ह्यातील एका पाच वर्षांच्या चिमुकलीच्या ही माहिती तोंडपाठ आहे. माळशिरस तालुक्यातील श्रीपूर गावात किराणा दुकान चालवणारे विनोद गाढवे यांची ही मुलगी आहे. ईश्वरी ही त्यांची मोठी मुलगी आहे. वयाच्या तिसऱ्या वर्षापासूनच तिने वडिलांना व्यायाम करताना पाहून कुस्तीचे धडे गिरवण्यास सुरुवात केली. पण या छोट्याशा मुलीसोबत कुस्ती खेळायला मैत्रिणी नसल्याने वडिलांनी घराजवळच कुस्तीचा आखाडा बनवला. वयाच्या चौथ्या वर्षापासून तिने कराटे शिकण्यास सुरुवात केली आणि वर्षातच 3 गोल्ड मेडल मिळविले. ईश्वरीला व्यायामासोबतच वयाच्या चौथ्या वर्षी अभ्यासाची आवड लागली. त्यामुळे तिच्या वडिलांनी तिला जनरल नॉलेजचे प्रश्न आणि उत्तर सांगण्यास सुरुवात केली. सांगितलेले सर्व प्रश्नांची उत्तरे तिला लगेच लक्षात राहत असल्याचं पाहून वडिलांनी तिला रोज 25 ते 30 प्रश्न आणि त्यांची उत्तरे सांगण्यास सुरुवात केली. चिमुकल्या ईश्वरीला वाचताही येत नाही आणि लिहिताही येत नाही. त्यामुळे तिला प्रश्न आणि उत्तर दोन्ही तोंडीच सांगावं लागतं. मग मात्र तिला रोजच नवीन प्रश्न लागू लागल्यावर वडिलांना ते एक कामच लागलं. सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा जनरल नॉलेजच्या पुस्तकातून नवीन प्रश्न काढून द्यायचे आणि तिला ते सांगायचे. मात्र हळूहळू सांगितलेले सर्वच प्रश्न आणि उत्तरे ती तासाभरात मुखोद्गत करू लागल्यावर तिला थोडे अवघड प्रश्न द्यायला सुरुवात केली पण त्या प्रश्नांचाही ईश्वरी असाच फडशा पडू लागल्यावर आता वडिलांच्या समोर ईश्वरीच एक प्रश्न बनू लागली आहे. ज्या वयात मुलांना त्यांचं नावही नीट सांगता येत नाही, त्या वयात ईश्वरी जगातील 50 देशांची नावं असोत किंवा जगातील 21 नद्यांची नावं असोत, आपल्या बोबड्या भाषेत ज्या पद्धतीने सांगते ते पाहता तिच्या बुद्धीची भूक अचाट तर आहेच पण त्या बुद्धीला चांगल्या पद्धतीने प्रशिक्षण मिळाल्यास त्याचा भविष्यात मोठा फायदा होईल. ईश्वरी सध्या श्रीपूरमधील इंदिराबाई आगाशे इंग्लिश स्कूलमधील बालवाडीतील मोठ्या वर्गात जाते. मात्र तिला कोणत्याही भाषेतील कविता सांगितली तर तिची ती कविता लगेच पाठ होते, असं तिच्या शिक्षिका सांगतात. मुंबईतील एका डॉक्टरांनी ईश्वरीच्या मेंदूची तपासणी केल्यावर त्यांनीही लाखात एखाद्याला अशी बुद्धिमत्ता लाभते, असा अहवाल दिला आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मनमाडमध्ये कांद्याचे लिलाव बंद, दरात होणार घसरण, शेतकरी संकटात, लिलाव बंद होण्याचं कारण काय?
मनमाडमध्ये कांद्याचे लिलाव बंद, दरात होणार घसरण, शेतकरी संकटात, लिलाव बंद होण्याचं कारण काय?
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 मार्च 2026 | शुक्रवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 मार्च 2026 | शुक्रवार
अकोल्यात तापमानानं गाठला विक्रमी उच्चांक, पारा 42 अंशावर, जनजीवन प्रभावीत, राज्यातील कोणत्या भागात किती तापमान?
अकोल्यात तापमानानं गाठला विक्रमी उच्चांक, पारा 42 अंशावर, जनजीवन प्रभावीत, राज्यातील कोणत्या भागात किती तापमान?
शिफारस पत्रासाठी 50 हजार लाचेची मागणी, वाशिमच्या शिक्षणाधिकारी मंगल धुपेंवर शिक्षकांचा गंभीर आरोप
शिफारस पत्रासाठी 50 हजार लाचेची मागणी, वाशिमच्या शिक्षणाधिकारी मंगल धुपेंवर शिक्षकांचा गंभीर आरोप

व्हिडीओ

Ritu Tawade PC : मुंबई महानगरपालिकेचा 100 दिवसांचा अॅक्शन प्लॅन काय? महापौर EXCLUSIVE
Amol Mitkari On VSR मुख्यमंत्री, मंत्र्यांना विनंती ट्रेन किंवा रस्त्याने प्रवास करा पण VSR ने नको
Pune Mess Gas Shortage युद्धाचं संकट, ताटातून चपाती कट;मेसलाही व्यावसायिक गॅसमुळे झळा
Politics On Gas Shortage : गॅस सिलिंडर टंचाईविरोधात काँग्रेस आक्रमक Special Report
Special Report Bomb Threat to Assembly : धमकीचा बॉम्ब, अफवांमुळे घाम! Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
इकडं कुवेतनंतर इराकमध्ये हवेत इंधन भरणारं अमेरिकन हवाई दलाचं विमान कोसळलं; चार क्रू मेंबर्सचा मृत्यू, 2 बेपत्ता; तिकडं ट्रम्पकडून इराण सुप्रीम लीडरांविरोधात भलताच दावा
इकडं कुवेतनंतर इराकमध्ये हवेत इंधन भरणारं अमेरिकन हवाई दलाचं विमान कोसळलं; चार क्रू मेंबर्सचा मृत्यू, 2 बेपत्ता; तिकडं ट्रम्पकडून इराण सुप्रीम लीडरांविरोधात भलताच दावा
India US Trade Deal : ट्रम्प यांच्या एका घोषणेनं भारत- अमेरिका व्यापार करारात खोडा? ट्रेड डीलची प्रक्रिया लांबणीवर पडणार? नेमकं काय घडलं? 
ट्रम्प यांच्या एका घोषणेनं भारत- अमेरिका व्यापार करारात खोडा? ट्रेड डीलची प्रक्रिया लांबणीवर पडणार?
नाम नरेंदर, काम सरेंडर, नरेंदर गायब, सिलेंडर गायब, देशातील गॅस संकटावरून लोकसभेत विरोधकांचा हल्लाबोल; मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी दोन्ही सभागृहात नोटीस
नाम नरेंदर, काम सरेंडर, नरेंदर गायब, सिलेंडर गायब, देशातील गॅस संकटावरून लोकसभेत विरोधकांचा हल्लाबोल; मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी दोन्ही सभागृहात नोटीस
Share Market Crash : शेअर मार्केट क्रॅश, सेन्सेक्स पाच दिवसात 4350 अंकांनी कोसळला,गुंतवणूकदारांना मोठा धक्का, तब्बल 20 लाख कोटी बुडाले
अमेरिका- इराण युद्ध, तेलाच्या वाढलेल्या दरानं शेअर बाजार कोसळला, गुंतवणूकदारांचे 5 दिवसात 20 लाख कोटी बुडाले
Multibagger Stock: 11 रुपयांचा मल्टीबॅगर स्टॉक 5 वर्षात 1200 रुपयांवर, एक लाखांचे बनले 1 कोटी, गुंतवणूकदार मालामाल  
11 रुपयांचा मल्टीबॅगर स्टॉक 5 वर्षात 1200 रुपयांवर, एक लाखांचे बनले 1 कोटी, गुंतवणूकदार मालामाल  
Period Leave : ... तर महिलांना कुणी नोकरी देणार नाही; पीरियड लीव्ह याचिकेवर सुनावणी करण्यास न्यायालयाचा नकार
... तर महिलांना कुणी नोकरी देणार नाही; पीरियड लीव्ह याचिकेवर सुनावणी करण्यास न्यायालयाचा नकार
US inquiry into India: पुन्हा टॅरिफ लादून दंडित करण्याची तयारी सुरु! आता अमेरिकेनं भारताची थेट चौकशी लावली; रशियन तेल खरेदीला 30 दिवसांची परवानगी दिल्यानंतर नवा आदेश
पुन्हा टॅरिफ लादून दंडित करण्याची तयारी सुरु! आता अमेरिकेनं भारताची थेट चौकशी लावली; रशियन तेल खरेदीला 30 दिवसांची परवानगी दिल्यानंतर नवा आदेश
Video: नवरा नवरी घेऊन जाणाऱ्या स्कॉर्पिओवर ओपन जीपमधून चक्क नोटांची उधळण; मांडवापासून ते भर रस्त्यावर नोटांचा खच पडला
Video: नवरा नवरी घेऊन जाणाऱ्या स्कॉर्पिओवर ओपन जीपमधून चक्क नोटांची उधळण; मांडवापासून ते भर रस्त्यावर नोटांचा खच पडला
Embed widget