विशेष म्हणजे लिओ वराडकर वराड येथील ग्रामदैवत वेतोबा मंदिरात आले तेव्हा ढोल ताशा वाजवत त्यांची मिरवणूक काढण्यात आली. तर चक्क मालवणी भाषेत गाऱ्हाणं घालून गावकऱ्यांनी नवस फेडला. यावेळी मंदिरात प्रवेश केल्यावर लिओ यांनी देवळातली घंटा वाजवून आत प्रवेश केला. तर जेव्हा गाऱ्हाणं सुरू होत तेव्हा त्यांनी हात जोडत नमस्कार केला.
हेही वाचा - नववर्षाच्या स्वागतासाठी कोकण व गोव्यात जाणाऱ्या पर्यटकांसाठी महत्वाची बातमी!
आयर्लंडचे पंतप्रधान लीवो वराडकर यानी गावातील लोकांशी मुक्त संवाद साधला. त्यांचा हा खासगी दौरा होता. आपल्या वडिलांच्या इच्छे खातर ते सहकुटुंब वराड येथे आले आहेत. यावेळी त्यांनी मालवणी जेवणाचा सहकुटुंब आस्वाद घेतला. लिओ यांनी गावात येऊन आपल्या घरा शेजारील जागेची पहाणी करून कोकण किती सुंदर आहे असे गोरवोद्वगार काढले. आपण लवकरच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान त्यांच्या भारतातील नातलगांनी लीओच्या लहानपणीच्या आठवणी सांगितल्या.
हेही वाचा - रत्नागिरीतील फुलपाखरांची रंगीबेरंगी दुनिया
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची परदेशात भेट झाली. मात्र, येत्या काळात आम्ही दोघे पुन्हा भेटणार आणि भारत आयर्लंड दोन्ही देशाचे संबंध अधिक मजबुत होतील, अशी प्रतिक्रिया लिओ वराडकर यांनी वराड गावात दिली. तर येत्या काळात वराड गावात विकासात्मक गोष्टी करून गावाचा विकास करणार असल्याची माहिती गावकऱ्यांशी संवाद साधताना सांगितली.
हेही वाचा - डिझेल अभावी रत्नागिरीत एसटीच्या 270 फेऱ्या रद्द; विद्यार्थी, नोकरदारांचे हाल
मुंबई-गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी, सुट्ट्यांमुळे पर्यटक कोकण-गोव्याच्या दिशेने | रायगड | ABP Majha