रत्नागिरीतील फुलपाखरांची रंगीबेरंगी दुनिया
(PHOTO : Pratik More)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App(PHOTO : Pratik More)
(PHOTO : Pratik More)
(PHOTO : Pratik More)
(PHOTO : Pratik More)
अगदी कमी कालावधीचे जीवन लाभलेला हा रंगबिरंगी मनमोहक जीव केवळ आणि केवळ आनंद वाटत फिरतो. कोंकणातील यांची ही रंगबिरंगी दुनिया पहायला नक्की या.! (PHOTO : Pratik More)
श्रावण महिन्यात या फुलपाखरांची खरी दुनिया आपल्याला अधिक दिसून येते. आता कोकणात रानफुलांचीही भरमार दिसून येते. या रानफुलांवरुन इकडून तिकडे उडणारी फुलपाखरे आपले मनमोहून घेतात. फुले, फळेही या फुलपाखरांद्वारे परागकणांचे संक्रमण केल्याने उमलून येतात. त्यामुळे जीवसृष्टीतील फुलपाखरांचे महत्व अनन्य साधारण आहे. (PHOTO : Pratik More)
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी फुलपाखरांचा अधिवास आहे. कोंकणातही त्यांचा उत्तम अधिवास आहे. रत्नागिरीमध्ये एकूण १६६ प्रकारची फुलपाखरे आढळून येत असल्याची नोंद आहे. (PHOTO : Pratik More)
श्रावण महिन्यात त्यांच्या उत्पत्तीचा कालावधी असतो. उन्हात ती अधिक बाहेर पडतात. तसेच सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशिरा ती एका ठिकाणी अधिकवेळ बसण्याचे चान्सेस असतात.कढीपत्ता, चाफा, शमी, अशोक, लिंबू आदी झाडांवर काही ठराविक प्रजातीची फुलपाखरे अंडी घालतात. ही अंडी डोळ्यांना पटकन दिसून येत नाहीत, इतकी छोटीशी असतात. फुलपाखरू अंड घालत असताना लक्ष गेले तर ते अंडे तुमच्या लक्षात येईल. (PHOTO : Pratik More)
देवरुखमधील फुलपाखरु प्रेमी आणि संशोधक प्रतिक मोरे यांनी आपल्या निवासस्थानी घराभोवती वेगवेगळी झाडे लावून त्यावर फुलपाखरे बसतील अशी बाग केली आहे.ते फुलपाखरांवर संशोधन करीत आहेत. फुलपाखरे जशी फुलांभोवती अधिक दिसतात,तशीच विविध प्रजातीची फुलपाखरे अगदी घाणेरी, दिंडा, दगडफूल, कुर्डू यांसारख्या झुडूपांवरही दिसून येतात. (PHOTO : Pratik More)
फुलपाखराला हाती पकडणे इतके कठीण आहे, तर मग त्याला कॅमेऱ्यात टिपणे किती अवघड असेल यांची कल्पनाच केलेली बरी! सतत ह्या फुलावरून त्या फुलावर कायम उडत राहणाऱ्या ह्या फुलपाखराला कॅमेऱ्याच्या फ्रेममध्येच पकडणे अवघड आहे. त्यासाठी तो इवलासा जीव आधी नजरेत येणे गरजेचे. एवढा छोटा जीव क्षणांत कुठे नाहीसा होईल सांगता येत नाही. त्यामुळे त्याच्यावर कायम नजर ठेवायला हवी. (PHOTO : Pratik More)
ही फुलपाखरे मुद्दामहून स्वतंत्र वेळ काढून पहायला हवी, त्यांच्या दुनियेत जाणीवपूर्वक रमायला हवे, तरच तुम्हाला त्यांच्या दुनियेचा आनंद मिळेल. अर्थात फुलपाखरांच्या मागे धावणे इतके सोपे नाही. इवलासा जीव किती पळत असतो आणि तुम्हीही मग त्याला पकडायला मागे धावता.तसे तर फुलपाखरू तुमच्या हाती येणे सोपे नाहीच! पण एखादे अनवधानाने आलेच, तुम्ही त्याला पकडलात तर ते तुम्हाला काही करत नाही, उलट ते त्याच्याकडील रंग तुमच्या बोटांवर सोडून जाते. (PHOTO : Pratik More)
श्रावण महिन्यात सुगंधी, रानफुलांची कोंकणावर पखरण होते. मग फुलांच्या या दुनियेत स्वच्छंदी वावरत असतात ती नाजूक, मनमोहक फुलपाखरे! नजरेला भरतील अशी छोटी-मोठी फुलपाखरांची दुनिया पाहिल्यानंतर त्यात हरपून जायला होते. फुलपाखरू...छान किती दिसते! या ओळी सहज मनात रुंजी घालू लागतात. (PHOTO : Pratik More)
महाराष्ट्राचे नंदनवन कोणते? असे कुणी विचारले तर लगेच ओठी नाव येते ते कोकणाचेच! ककणाला निसर्गाने भरभरुन दान दिले आहे. येथील जैव विविधता पाहून तर थक्क व्हायला होते. पशु, पक्षांच्या विविध जाती-प्रजाती कोकणच्या नंदनवनात गुण्यागोविंदाने नांदत आहेत. पावसाळ्यात कोकण हिरवेगार होते. श्रावणात हे निसर्ग सौंदर्य अधिक खुलून येते. श्रावणाच्या सौंदर्याला सप्तरंगाची आरास करतात ती रंगबिरंगी फुलपाखरे! (PHOTO : Pratik More)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -