मुंबई : शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार उद्या पार पडणार आहे. मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर तयारीही जोरदार सुरु आहे. मात्र उद्या मंत्रिमंडळ विस्तारात गृहखातं कोणाकडे जाणार याची उत्सुकता सर्वांना आहे. अर्थमंत्री जयंत पाटील यांनीही या प्रश्नाचं गुढ कायम ठेवलं आहे. मंत्रिमंडळ विस्तारबाबत राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची बैठक पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थिती पार पडली. त्यानंतर बोलताना अर्थमंत्री जयंत पाटील यांनी गृहखात्याबद्दची उत्सुकता कायम ठेवली आहे. “गृहखातं कोणाकडे जाणार हे मंत्रिमंडळ विस्तारानंतरच कळेल” अस वक्तव्य जयंत पाटील यांनी केलं आहे.


मंत्रिमंडळातील खातेवाटपासंदर्भात सर्व अधिकार मुख्यमंत्र्याचे आहेत. सरकारमधील सर्व पक्षांचा विचार मुख्यमंत्री करतील आणि खातेवाटप जाहीर करतील असा विश्वास जयंत पाटलांनी व्यक्त केला. तसेच आत्ताचं खातेवाटप हे तात्पुरत्या स्वरुपाच असल्याचंही त्यांनी सांगितलं. सरकारमधील सहा मंत्र्यांपैकी प्रत्येकाकडे पाच ते सात खाती आहेत. त्याच पुर्नवाटप मुख्यमंत्री लवकरचं जाहीर करणार असल्याचंही पाटील म्हणाले. मंत्रिमंडळ विस्ताराबाबतची राष्ट्रवादी काँग्रेसची यादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार काही तासांत मुख्यमंत्र्यांकडे पाठवतील. गृहखातं कुणाकडे असेल हे विस्तारानंतर कळेल, अशी माहिती पाटील यांनी दिली.

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत घटकपक्षांशी यापूर्वीही चर्चा झालेल्या आहेत. घटकपक्षांचं सहकार्य सरकारला लागणार आहे. त्यामुळे सरकार घटकपक्षांच्या वैशिष्ट्यांचा योग्य वापर करुन घेईल असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला. तसेचं कर्जमाफीवरुन घटकपक्षांनी केलेल्या सूचनांचा सरकार नक्की विचार करेल असेही पाटील म्हणाले.



मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या निवासस्थानी नेत्यांची बैठक पार पडली. अजित पवार, प्रफुल पटेल, जयंत पाटलांसह राष्ट्रवादीचे नेते सिल्व्हर ओकवर उपस्थित होते. या बैठकीत उपमुख्यमंत्री आणि गृहखात्यासंदर्भात चर्चा झाली असून, खातेवाटपावरही अंतिम चर्चा झाल्याची माहिती मिळते आहे.

राष्ट्रवादीचे हे नेते शपथ घेऊ शकतात

पश्चिम महाराष्ट्र 
अजित पवार
दिलीप वळसे पाटील
हसन मुश्रीफ
बाळासाहेब पाटील
दत्ता भरणे

विदर्भ
अनिल देशमुख

ठाणे
जितेंद्र आव्हाड

मुंबई
नवाब मलिक

मराठवाडा
धनंजय मुंडे
राजेश टोपे
डॉ. राजेंद्र शिंगणे

कोकण
अदिती तटकरे

उत्तर महाराष्ट्र
डॉ. किरण लहामटे

कुणाला किती मंत्रिपदं मिळणार? 

शिवसेनेचे 13 मंत्री शपथ घेणार आहेत, त्यामध्ये 10 कॅबिनेट आणि तीन राज्यमंत्र्यांचा समावेश असू शकतो. राष्ट्रवादीचे 13 मंत्री शपथ घेणार आहेत त्यामध्ये कॅबिनेट 10 आणि तीन राज्यमंत्री शपथ घेऊ शकतात. काँग्रेसचे 10 मंत्री शपथ घेणार आहेत, त्यामध्ये 8 कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्री शपथ घेणार आहेत. मंत्रिमंडळ विस्तारात काही खाती रिक्त ठेवण्यात येतील अशी माहिती आधी मिळत होती. मात्र आता सर्व खाती भरण्यात येतील, असं बोललं जात आहेत.



संबंधित बातम्या


'ठाकरे' सरकारचा उद्या मंत्रिमंडळ विस्तार, 'हे' नेते मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता?


Maharashtra Cabinet | शिवसेनेचे मुंबई आणि ठाणे शहरातले पाच नेते मंत्रिमंडळात | ABP Majha


Mumbai | ठाकरे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, संभाव्य मंत्र्यांची यादी 'एबीपी माझा'च्या हाती | ABP Majha