IPS Officer Transfers: गृह विभागाकडून राज्यातील अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. तर काहींना पदोन्नती देत बदल्या करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे गेल्या अनेक दिवसांपासून वेगेवेगळ्या आरोपांमुळे चर्चेत आलेल्या छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांच्या जागी पिंपरी चिंचवडचे पोलीस सहआयुक्त मनोज लोहिया यांची बदली करण्यात आली आहे. तर निखील गुप्ता यांच्या बदलीचे विशेष आदेश काढण्यात येणार असल्याचे आदेशात म्हटले आहे.


ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजीत सिंह यांना पदोन्नती देण्यात आली आहे. सोबतच दहशतवाद विरोधी पथकाचे अपर महासंचालक सदानंद दाते आणि आर्थिक गुन्हे शाखेचे अपर महासंचालक बिपीन कुमार सिंह यांना देखील पदोन्नती देण्यात आली आहे. 


पाहा कोणाची कुठे बदली! 


पहिली यादी...




दुसरी यादी...




तिसरी यादी....




निखील गुप्ता यांचीही बदली....


गृह विभागाने काढलेल्या बदलीच्या यादीत छत्रपती संभाजीनगरच्या पोलीस आयुक्त पदावर पिंपरी चिंचवडचे पोलीस सहआयुक्त मनोज लोहिया यांची बदली करण्यात आली आहे. तर सध्याचे पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांच्या बदलीचे विशेष आदेश काढले जाणार आहे. तर संभाजीनगरमध्ये झालेल्या राड्यावरून निखील गुप्ता हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होते. तर त्यांच्यावर वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांनी गंभीर आरोप देखील केले होते. एवढंच नाही तर संभाजीनगरमध्ये झालेल्या राड्यात गुप्ता यांची नेमकी भूमिका काय होती, त्यांना स्वतःला शहरात अशांतता निर्माण करायची होती का? याची चौकशी करण्याची मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली होती. त्यामुळे या सर्व आरोपांमुळे निखील गुप्ता सतत चर्चेत होते. 


संभाजीनगरच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांचीही बदली...


राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. दरम्यान याचवेळी छत्रपती संभाजीनगरचे विशेष पोलीस महानिरीक्षक के. एम. मल्लिकार्जुन यांची देखील बदली करण्यात आली आहे. मल्लिकार्जुन यांची मुंबई विशेष पोलीस पोलीस महानिरीक्षकपदी बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी आता बृहन्मुंबई गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त डी.एस. चव्हाण यांच पदोन्नती होऊन बदली करण्यात आली आहे. विशेष म्हणजे संभाजीनगरचे नवीन पोलीस आयुक्त  मनोज लोहिया आणि नव्याने छत्रपती संभाजीनगरचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून बदलून आलेले डी.एस. चव्हाण या दोघांनी शहर पोलिसात यापूर्वी एसीपी म्हणून काम पाहिलेले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


राज्यात भविष्यात शिक्षकांच्या बदल्या न करण्यासंदर्भात विचार, शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची माहिती