एक्स्प्लोर

'त्या' वक्तव्याची नाशिक पालिकेकडून दखल, संभाजी भिडेंची चौकशी होणार

संभाजी भिडे यांच्या वादग्रस्त वक्तव्याची दखल नाशिक महापालिकेनं घेतली आहे. महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून चौकशी आता भिडेंची चौकशी होणार आहे. आरोग्य संचलनालयाकडून नाशिक मनपाला पत्र मिळाल्याने भिडेंची चौकशी केली जाणार आहे.

नाशिक : संभाजी भिडे यांच्या वादग्रस्त वक्तव्याची दखल नाशिक महापालिकेनं घेतली आहे. महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून चौकशी आता भिडेंची चौकशी होणार आहे. आरोग्य संचलनालयाकडून नाशिक मनपाला पत्र मिळाल्याने भिडेंची चौकशी केली जाणार आहे. राज्य कुटुंब कल्याण विभागामार्फत नाशिक महापालिकेला बुधवारी पत्र पाठवण्यात आलं आहे. या पत्रात मनोहर उर्फ संभाजी भिडे यांनी त्यांच्या शेतातील आंबा खाल्ल्याने मुलं होतात, या वक्तव्याची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर भिडेंच्या त्या वक्तव्यात तथ्य आढळल्यास पीसीपीएनडीटी अक्टनुसार भिडेंवर कारवाई करण्याच्या सूचनाही करण्यात आली आहे. आरोग्य विभागाच्या अतिरिक्त संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी नाशिक महापालिकेला हे पत्र पाठवलं आहे. दरम्यान नाशिक मनपाकडे संभाजी भिडेंचा पत्ता नसल्याने नोटीस कुठे पाठवायची असा महापालिका प्रशासनाला प्रश्न पडला आहे. काय होतं संभाजी भिडेंचं वादग्रस्त वक्तव्य? माझ्या शेतातील आंबा खाल्ला तर जोडप्यांना अपत्यप्राप्ती होते," असं अजब दावा श्री शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केलं आहे. नाशिकमध्ये झालेल्या एका सभेत त्यांनी हे विधान केलं. भिडेंनी सभेत शिवकालीन इतिहासाचे दाखले देत सध्याची सामाजिक, राजकीय व्यवस्थेवर जोरदार प्रहार केलेच, पण आपल्या शेतातील आंब्याचे दाखलेही दिले. हे आंबे खाल्ल्याने जवळपास 150 जोडप्यांना अपत्यप्राप्ती झाल्याचा दावा त्यांनी केला. संभाजी भिडे म्हणाले की, "भगवंताची कृपा आहे ही मला एक कोय मिळाली. त्या कोईचं रोपटं करुन आता त्याचं झाडं झालं. ते आंब्याचं झाड माझ्याकडे आहे. त्याची काय मजा आहे, ते सांगतो तुम्हाला. अहो, लग्न होऊन 8-8, 10-10, 12-12 वर्ष झालेल्यांना सुद्धा पोर होत नाही, अशा स्त्री-पुरुषांनी, पती पत्नींनी ती फळं खाल्ली, तर निश्चित पोर होईल. असं झाड आहे माझ्याकडे. रोज आंबे आणून, माझ्याही बागेत, शेतात ते लावले. मी आता तुम्हाला सोडलं तर माझ्या आईशिवाय कोणाला सांगितलं नाही, ते आंबे कसे आहेत. मी आतापर्यंत 180 पेक्षा जास्त जणांना, पती-पत्नींना, जोडप्यांना खायला दिलेत. ती पद्धत शिकवली, पथ्य सांगितलं आणि 150 पेक्षा जास्त जणांना मुलं झाली. ज्यांना मुलगा हवा असेल, त्यांना मुलगाच होईल. अपत्य नसेल तर होते. असा हा आंबा आहे. म्हणजे त्याचा अर्थ नपुंसकत्वावर तोडगा आणि वंध्यत्वावरचा ताकद देणारा तो आंबा आहे." भिडेंच्या आंब्याच्या विधानानंतर सोशल मीडियावर विनोदाचा पाऊस "माझ्या शेतातील आंबा खाल्ला तर जोडप्यांना अपत्यप्राप्ती होते," असं अजब दावा श्री शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केलं आहे. नाशिकमध्ये झालेल्या एका सभेत त्यांनी हे विधान केलं. भिडेंनी सभेत शिवकालीन इतिहासाचे दाखले देत सध्याची सामाजिक, राजकीय व्यवस्थेवर जोरदार प्रहार केलेच, पण आपल्या शेतातील आंब्याचे दाखलेही दिले. हे आंबे खाल्ल्याने जवळपास 150 जोडप्यांना अपत्यप्राप्ती झाल्याचा दावा त्यांनी केला. संभाजी भिडे यांच्या या विधानाची सोशल मीडियावर खिल्ली उडवली जात आहे. आंब्याचा आधार घेत विनोदांचा वर्षाव अक्षरश: सुरु आहे. नेटकऱ्यांच्या फेसबुकीय प्रतिभेला जणू धुमारेच फुटले आहे. भिडेंच्या विधानावर कोण चांगला विनोद करतो, ह्याची चढाओढच सुरु आहे. इतकंच नाही तर 'अशी ही बनवाबनवी' चित्रपटातील पारु अर्थात लक्ष्याच्या आंबा खाऊन गरोदर झाल्याचा सीनही भिडेंच्या विधानानंतर पुन्हा शेअर केला जात आहे. संबंधित बातम्या : माझ्या बागेतील आंबे खाऊन अनेकांना मुलं झाली : संभाजी भिडे भिडेंच्या आंब्याच्या विधानानंतर सोशल मीडियावर विनोदाचा पाऊस भिडे गुरुजी आजचे ‘बाजीप्रभू’, आम्ही त्यांच्यासोबत : शिवसेना

महत्त्वाच्या बातम्या

Supriya Sule: जयंत पाटील-विनोद तावडेंची गुपचूप भेट, शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीत? सुप्रिया सुळे, रोहित पवारांची प्रतिक्रिया
जयंत पाटील-विनोद तावडेंची गुपचूप भेट, शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीत? सुप्रिया सुळे, रोहित पवारांची प्रतिक्रिया
Beed Vaidyanatha Temple: राष्ट्रीय सुरक्षा पथक बीडमधील वैजनाथाच्या मंदिरात धडकलं, सुरक्षेबाबत अत्यंत महत्त्वाची सूचना, नेमकं काय घडलं?
राष्ट्रीय सुरक्षा पथक बीडमधील वैजनाथाच्या मंदिरात धडकलं, सुरक्षेबाबत अत्यंत महत्त्वाची सूचना, नेमकं काय घडलं?
महाबळेश्वरमध्ये 100 वर्षांतील विक्रमी पाऊस; 24 तासांत 513 मिमिची नोंद, अतिट गावात ढगफुटी
महाबळेश्वरमध्ये 100 वर्षांतील विक्रमी पाऊस; 24 तासांत 513 मिमिची नोंद, अतिट गावात ढगफुटी
Maharashtra Rain LIVE Updates: : महाराष्ट्राभरात पावसाचं थैमान! नाशिक जिल्ह्यात ढगफुटीसदृश्य पावसाचा अंदाज, त्रंबकेश्वर, सप्तशृंगी मंदिरसह शाळा महाविद्यालये बंद
Maharashtra Rain LIVE Updates: : महाराष्ट्राभरात पावसाचं थैमान! नाशिक जिल्ह्यात ढगफुटीसदृश्य पावसाचा अंदाज, त्रंबकेश्वर, सप्तशृंगी मंदिरसह शाळा महाविद्यालये बंद

व्हिडीओ

Taloja Accident News : नवी मुंबई तळोजात भीषण अपघात, बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले
Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?
Raigad Flood | चार नद्या धोक्याच्या पातळीवर; बचावकार्याचं आव्हान, रायगडला पाण्याने वेढलं | ABP Majha Special Report
Vasai-Virar Flood | पावसाने वसई-विरार, नालासोपारा जलमय; जनजीवन पूर्ण विस्कळीत - ABP Majha
Missing Link Landslide | उद्घाटनानंतरच दरड; मिसिंगलिंकवरुन राजकारण | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ambadas Danve: रमाई आवास योजनेत मोठा भ्रष्टाचार; भाजप नगरसेविकेचा मुलगा लाभार्थी, देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदेंच्या नावे टॅक्स पावती; अंबादास दानवेंचा गंभीर आरोप
छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील रमाई आवास योजनेत मोठा भ्रष्टाचार; भाजप नगरसेविकेचा मुलगा लाभार्थी, देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदेंच्या नावे टॅक्स पावती; अंबादास दानवेंचा गंभीर आरोप
Supriya Sule: जयंत पाटील-विनोद तावडेंची गुपचूप भेट, शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीत? सुप्रिया सुळे, रोहित पवारांची प्रतिक्रिया
जयंत पाटील-विनोद तावडेंची गुपचूप भेट, शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीत? सुप्रिया सुळे, रोहित पवारांची प्रतिक्रिया
High Court on FDA Actions: तुकाराम मुंढेंची गोरस भांडारवरील कारवाई बेकायदेशीर; नागपूर खंडपीठाचा महत्वपूर्ण निर्णय; निलंबित केलेला परवाना त्वरित बहाल करण्याचे कोर्टाचे निर्देश
तुकाराम मुंढेंची गोरस भांडारवरील कारवाई बेकायदेशीर; नागपूर खंडपीठाचा महत्वपूर्ण निर्णय; निलंबित केलेला परवाना त्वरित बहाल करण्याचे कोर्टाचे निर्देश
महाबळेश्वरमध्ये 100 वर्षांतील विक्रमी पाऊस; 24 तासांत 513 मिमिची नोंद, अतिट गावात ढगफुटी
महाबळेश्वरमध्ये 100 वर्षांतील विक्रमी पाऊस; 24 तासांत 513 मिमिची नोंद, अतिट गावात ढगफुटी
Maharashtra Rajbhavan SRPF Constable News: महिला पोलीस कॉन्स्टेबलसोबत प्रेमसंबंध, तिच्या होणाऱ्या नवऱ्याला खाजगी फोटो पाठवले; SRPF कौस्तुभ सांगळेच्या मृत्यू प्रकरणात सगळ्यात मोठा ट्विस्ट
महिला पोलीस कॉन्स्टेबलसोबत प्रेमसंबंध, तिच्या होणाऱ्या नवऱ्याला खाजगी फोटो पाठवले; SRPF कौस्तुभ सांगळेच्या मृत्यू प्रकरणात सगळ्यात मोठा ट्विस्ट
मुंबईत तीन दिवसांत 400 झाडं पडली, 600 फांद्या तुटल्या; दोघांचा मृत्यू, महापालिका आयुक्तांनी दिली माहिती
मुंबईत तीन दिवसांत 400 झाडं पडली, 600 फांद्या तुटल्या; दोघांचा मृत्यू, महापालिका आयुक्तांनी दिली माहिती
Devendra Fadnavis On Shivani Kalmekar Buldhana Case: पोलिसांचे काम अत्यंत लाजीरवाणे; शिवानी कळमेकर प्रकरणात देवेंद्र फडणवीसांची धक्कादायक माहिती
पोलिसांचे काम अत्यंत लाजीरवाणे; शिवानी कळमेकर प्रकरणात देवेंद्र फडणवीसांची धक्कादायक माहिती
मोठी बातमी! नवी मुंबईत बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले; भीषण अपघातात एकाचा मृत्यू
मोठी बातमी! नवी मुंबईत बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले; भीषण अपघातात एकाचा मृत्यू
Embed widget