Irrigation scam Latest Update : राज्यातल्या सर्वात मोठ्या अशा सिंचन घोटाळ्यात (irrigation scam) कथित क्लीनचिट ऐवजी दोषींना शिक्षाच मिळेल, असा दावा प्रमुख याचिकाकर्ते जनमंच संघटनेनं (Janmanch Sanghtana) केला आहे.  याचिकेकर्ते म्हणून आम्ही अत्यंत सबळ पुरावे घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या अँटी करप्शन ब्युरो (ACB) तसेच न्यायालयापुढे ठेवले आहे.  त्यामुळे सध्या चर्चेत असलेल्या कथित क्लीनचिट ऐवजी दोषींना शिक्षाच मिळेल असा विश्वास जनमंच या संघटनेचे अध्यक्ष राजीव जगताप (Rajiv Jagtap) यांनी व्यक्त केला आहे. 


राजीव जगताप यांनी म्हटलं आहे की, सिंचन घोटाळ्यात नऊ प्रकरणांमध्ये अँटी करप्शन ब्युरोने एका नेत्याला क्लीनचिट दिल्याचे फक्त ऐकले आहे. गेले तीन वर्ष यासंदर्भात न्यायालयात तसे काहीही घडलेले नाही,  साधे भाष्यही झालेले नाही.  उलट घोटाळ्यासंदर्भात 2019 च्या पूर्वी अँटी करप्शन ब्युरो तसेच न्यायालयासमोर जे अभ्यासपूर्ण पुरावे मांडले होते. त्याच्याच आधारावर एंटी करप्शन ब्युरोने अनेक गुन्हेही दाखल केले होते. त्यामुळे तेच सबळ पुरावे आता दोषींना शिक्षेपर्यंत नेतील, असंही राजीव जगताप यांनी म्हटलं आहे.


जगताप यांनी म्हटलं आहे की, अधिकारी, कंत्राटदार यांच्यासह घोटाळ्यात काही मोठ्या राजकीय नेत्यांचाही नाव आहे. कदाचित त्यामुळेच हे प्रकरण खूप लांबले आहे. जर या प्रकरणात फक्त अधिकाऱ्यांचा किंवा कर्मचाऱ्यांचा समावेश राहिला असता, कोणत्याही मोठ्या नेत्याचं नाव त्यात अडकला नसता, तर अशी दिरंगाई झालीच नसती अशी खंत ही जनमंचने व्यक्त केली आहे. 


2012 मध्ये याचिका दाखल केल्यानंतर आतापर्यंत दहा वर्षांचा कालावधी उलटला असला तरी अजूनही आमचा न्यायंत्रणेवर पूर्ण विश्वास आहे. न्यायालय दोषींना नक्कीच शिक्षा देईल. दरम्यान 2012 मध्ये याचिका करताना आम्ही या घोटाळ्याचा तपास सीबीआय मार्फत करावा अशी मागणी केली होती. तेव्हा आमचा अँटी करप्शन ब्युरोच्या तपासाला विरोध होता. मात्र, आता दहा वर्ष अँटी करप्शन ब्युरोने तपास यंत्रणा म्हणून घोटाळ्याचा तपास केल्यानंतर पुन्हा नव्या तपास यंत्रणेकडे तपास द्यावा अशी मागणी करण्याची चूक आम्ही करणार नाही. आता अँटी करप्शन ब्युरोनेच प्रामाणिकपणे या प्रकरणाचा तपास करावा आणि दोषींना शिक्षेपर्यंत न्यावे अशी आमची अपेक्षा आहे, असं जनमंच संघटनेनं म्हटलं आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या


Irrigation scam : सिंचन घोटाळा प्रकरणात विजय पांढरे यांची एन्ट्री, गेल्या 10 वर्षात घोटाळ्याची चौकशीच झाली नसल्याचा आरोप