Indrayani Colours Marathi Serial: गोपाळ परतल्यानं इंदू-अधूच्या संसारात मिठाचा खडा पडणार? दोघेही नात्यांची कसोटी पार करणार? PHOTOs
Indrayani Colours Marathi Serial Track: कलर्स मराठीवरील इंद्रायणी मालिकेत सध्या नाट्यमय वळण आलं आहे. प्रेक्षकांच्या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम मिळाला आणि इंदू-अधूचं लग्न मोठ्या थाटामाटात पार पडलं.
Indrayani Colours Marathi Serial Track
1/8
मात्र, लग्नानंतर लगेचच त्यांच्या संसारावर संकटांची मालिका सुरू झाली आहे. इंदू आणि अधूच्या नात्याला आनंदीबाई आणि गोपाळने मोठं आव्हान दिलं आहे.
2/8
गोपाळ आणि आनंदीबाई दोघांचंही ठाम मत आहे, "हा संसार सुखाचा होऊ द्यायचा नाही" हे आव्हान इतक्यावरच थांबत नाही.
3/8
गोपाळ अनेक वर्षांनी दिग्रसकरांच्या वाड्यात परत येणार आहे आणि तेही कायमस्वरूपी! कारण? शकुंतलाला झालेला पोटाचा कॅन्सर.
4/8
तिच्या उपचारांची जबाबदारी गोपाळ घेतो आणि त्यातूनच तो पुन्हा घरात पाय ठेवतो. पण त्यामागे आहे एक गूढ हेतू इंदू-अधूचा नव्यानं सुरू झालेला संसार उध्वस्त करणं.
5/8
एकीकडे इंदू तिच्या संसारासाठी झगडते आहे, तर दुसरीकडे अधूवर झालेला जीवघेणा हल्ला त्यांचं नातं अधिक घट्ट करत जातो.
6/8
देवदर्शनाला गेले असताना अधूवर हल्ला होतो, पण त्या कठीण प्रसंगात दोघंही एकमेकांच्या साथीनं ती वेळ पार करतात.
7/8
अधूचा रुसवा दूर होतो आणि नव्याने संसार सुरू होतो. पण या सुरुवातीलाच गोपाळचं परतणं आणि त्यात आनंदीबाईंची साथ - हे सर्व गोष्टी पुन्हा एकदा वादळाची चाहूल देतात.
8/8
गोपाळ आपल्या प्लॅनमध्ये यशस्वी होणार का? इंदू आणि अधू हे नवं आव्हान कसं पार करतील? त्यांच्या नात्याची कसोटी यातून कशी लागेल? मालिकेच्या आगामी भागांमधून उलगडेल.
Published at : 26 Jun 2025 01:36 PM (IST)