Mumbai Hightide: आज मुंबईत वर्षातील सर्वात उंच भरती; दुपारी 12.55 वाजता 16 फूट उंच लाटा उसळल्या, वस्त्यांमध्ये पाणी शिरलं, पुढील 5 दिवस पालिकेकडून अलर्ट
Mumbai Hightide: या वर्षीच्या (2025) पावसाळी हंगामात एकूण 19 वेळा समुद्रात मोठी भरती (हाय टाइड) होणार आहे. महापालिकेने नागरिकांना या काळात अधिक सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
Mumbai Hightide
1/9
आज (26 जून) मुंबईत यंदाच्या वर्षातील सर्वात मोठी भरती होणार आहे. दुपारी 12.55 वाजता 16 फूट उंच लाटा समुद्रात उसळत असून त्यामुळे किनारपट्टी भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
2/9
मुंबई महापालिकेने 24 ते 28 जून 2025 या कालावधीत सलग 5 दिवस समुद्रात मोठ्या भरती होणार आहेत. या काळात भरतीच्या वेळेस समुद्रात जाणं किंवा किनाऱ्याजवळ फिरणं टाळावं, असं आवाहन करण्यात आलं आहे.
3/9
“मोठी भरती” म्हणजे, जेव्हा समुद्रातील लाटांची उंची 4.50 मीटर किंवा त्याहून अधिक असते. यामुळे किनाऱ्यालगतच्या भागांना अधिक धोका असतो आणि पावसात पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वाढते.
4/9
मुंबईत मान्सून जरी उकाड्यापासून दिलासा देत असला, तरी त्याचबरोबर अनेक चिंता आणि अडचणीही घेऊन येतो.
5/9
मुसळधार पावसामुळे शहरातील सखल भाग जलमय होतात आणि जनजीवन विस्कळीत होते.
6/9
मुंबई हे शहर तीन बाजूंनी समुद्राने वेढलेलं आहे. जर पावसाच्या वेळी समुद्रात भरती असेल, तर शहरातील पाणी समुद्रात मोकळेपणाने जाऊ शकत नाही. त्यामुळे अनेक वेळा सखल भाग, रेल्वे ट्रॅक आणि रस्ते पाण्याखाली जातात आणि वाहतूक ठप्प होते.
7/9
आज मुंबईत वर्षातील सर्वात उंच भरती असून दुपारी 12.55 वाजता 16 फूट उंच लाटा उसळत होत्या.
8/9
या लाटांमुळे किनारपट्टी भागातील वस्तीत पाणी शिरलं असून नागरिकांची मोठी तारांबळ उडाली आहे.
9/9
महानगरपालिकेच्या माहितीनुसार, 2025 मध्ये एकूण 19 वेळा मुंबईकरांची चिंता वाढू शकते. विशेष म्हणजे, 24 ते 28 जून 2025 या कालावधीत सलग 5 दिवस समुद्रात मोठ्या भरती होणार आहेत.
Published at : 26 Jun 2025 01:56 PM (IST)