Indrayani River Bridge Collapses : पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कुंडमळा येथील इंद्रायणी नदीवरील पुल कोसळल्याची (Indrayani River Bridge Collapses) धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये 20 ते 25 पर्यटक बुडाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत 2 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 32 जण झखमी झाले आहेत. सध्या घटनास्थळी बचावकार्य सुरु आहे. मात्र, ही घटना नेमकी कशी घडली याबाबतची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.
दरवर्षी पावसाळ्यात वर्षाविहाराचा आनंद लुटण्यासाठी पुणे, पिंपरी चिंचवडसह मावळ तालुक्यातील हजारो जण कुंडमळ्याला जातात. तेथीलच इंद्रायणी नदीवरील पूल रविवारी दुपारच्या सुमाास कोसळला. पर्यटकांचा समूह पुलावर असताना पूल कोसळल्याने जीवित हानी झाली आहे, यामध्ये अनेकजण जखमी झाले आहेत. दरम्यान, ही पूल कोसळल्याची घटना नेमकी कशी घडली याबाबतची माहिती तेथील काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आहे.
नेमकी कशी घडली घटना?
पूल कोसळल्याची घटना नेमकी कशी घडली? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. प्रत्यक्षदर्शीच्या म्हणण्यानुसार, आमचा 25 ते 30 जणांचा समूह पुलावर होता. एकाच ठिकाणी काही वेळ आम्ही सर्वजण थांबलो होतो. आम्ही पुलावर असतानाच काही कळायच्या आतच पूल कोसळल्याने बरेच जण खाली पडले. त्यातील काही लोक लगेच नदीच्या काठावर आले. परंतु काही लोक पाण्यात पडून बुडाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आहे. वाहून गेलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
पुलाची क्षमता कमी असल्याने आणि भार अधिक झाल्याने पूल कोसळला
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, इंद्रायणी नदीवरील पूल अतिशय जीर्ण झालेला होता. त्याच पुलावर पर्यटक समूहाने फोटो काढत होते. नदीच्या एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे जाण्याचा प्रयत्न पर्यटकांचा होता. मात्र पुलाची क्षमता कमी असल्याने आणि भार अधिक झाल्याने पूल कोसळल्याची घटना घडल्याचे प्रथमदर्शनी बोलले जात आहे. दरम्यान, या घटनेनंतर तातडीने प्रशासनाने बचावकार्य सुरु केले आहे. काही जणांना बाहेर काढण्यात यश देखील आलं आहे.
दरवर्षी पावसाळ्याला सुरुवात झाली की मावळ तालुक्यात हजारो पर्यटक येतात
दरवर्षी पावसाळ्याला सुरुवात झाली की हजारो पर्यटक मावळ तालुक्यातील अनेक प्रसिद्ध पर्यटनस्थळांकडे वळतात. आज रविवारी सुट्टीच्या दिवशी प्रसिद्ध कुंडमळ्याला पर्यटकांनी गर्दी केली होती. येथीलच इंद्रायणी नदीवरील पुलावरून पर्यटक जात असताना पूल अचानक खचला, खाली कोसळल्याची घटना घडली आहे. .घटनास्थळी पोलीस, अग्निशमन दल, तसेच बचाव पथके काही वेळात दाखल झाली.
महत्वाच्या बातम्या:
Pune News : पुण्यातील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला, 20 ते 25 जण वाहून गेल्याची भीती