एक्स्प्लोर

पुण्यात 21 वर्षीय तरुणीवर देशातलं पहिलं गर्भाशय ट्रान्सप्लांट

पुणे : देशातलं पहिलं गर्भाशय प्रत्यारोपण पुण्यात होत आहे. सोलापुरातील 21 वर्षीय तरुणीच्या शरीरात तिच्याच आईचं गर्भाशय ट्रान्सप्लांट करण्यात येत आहे. 12 निष्णात डॉक्टरांची टीम ही अत्यंत गुंतागुंतीची मानली जाणारी शस्त्रक्रिया करत आहेत. इतर देशांमध्ये यशस्वीरित्या पार पडलेलं गर्भाशयाचं ट्रान्सप्लांटेशन पहिल्यांदाच भारतात होणार आहे. पुण्याच्या रुग्णालयात तीन महिलांच्या शरीरात त्यांच्या आईच्या गर्भाशयाचं प्रत्यारोपण केलं जाणार आहे. गुरुवारी सकाळी या शस्त्रक्रियेला सुरुवात होणार असून आईच्या शरीरातील गर्भाशय काढून मुलीला प्रत्यारोपण करण्याच्या प्रक्रियेला आठ तास लागणार आहेत.

विज्ञानाचा चमत्कार! देशातील पहिलं गर्भाशय प्रत्यारोपण पुण्यात

त्याचप्रमाणे बडोद्याच्या 24 वर्षीय तरुणीवरही शुक्रवारी गर्भाशय प्रत्यारोपण करण्यात येणार आहे. तिलाही तिच्या आईचं गर्भाशय दान करण्यात येईल. या शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यास दोन्ही तरुणींना मातृत्वसुख अनुभवता येईल. दोन्ही तरुणींवरील शस्त्रक्रियेचा खर्च सात ते आठ लाख रुपयांच्या घरात आहे, मात्र हे प्रत्यारोपण मोफत करण्यात येणार असल्याची माहिती आहे. गर्भाशयाच्या कर्करोगाने ग्रस्त असलेल्या आणखी एका महिलेला गर्भाशय प्रत्यारोपण करण्यात येणार आहे. पुण्याच्या गॅलक्सी केअर लॅप्रोस्कोपी इन्स्टिट्यूटमध्ये (जीएलसीआय) हे प्रत्यारोपण होत आहे. राज्य आरोग्य सेवा संचालनालयाने 'जीएलसीआय'ला गर्भाशय प्रत्यारोपणाचा परवाना दिला होता. पाच वर्षांसाठी हा परवाना प्राप्त झाला आहे.

अमेरिकेत पहिल्यांदाच गर्भाशय प्रत्यारोपण यशस्वी

जगभरात आतापर्यंत फक्त 25 गर्भाशय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत. त्यातही प्रत्यारोपणानंतर केवळ दहा महिलांना गर्भधारणा झाली आहे. 2014 साली स्वीडनमध्ये जगातील सर्वात पहिलं गर्भाशय प्रत्यारोपण झालं होतं. बंगळुरुच्या 'मिलान इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रेनिंग अँड रिसर्च इन रिप्रॉडक्टिव्ह हेल्थ'लाही दोन महिलांचं गर्भाशय प्रत्यारोपण करण्यासाठी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेची परवानगी मिळाली आहे. गर्भाशयाशी संबंधित काही कारणांमुळे अनेक महिलांना मूल होत नाही. धक्कादायक म्हणजे जगातील जवळपास तीन ते चार टक्के महिला या कारणामुळे मातृत्वापासून वंचित राहतात.

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा इशारा; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, उद्या 2 जुलै रोजी शाळेला सुट्टी
मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा इशारा; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, उद्या 2 जुलै रोजी शाळेला सुट्टी
Maharashtra Rain Update : आभाळ फाटलं, मुंबई तुंबली! राज्यात पावसाचा हाहाकार, कुठे झाडं पडली, तर कुठे रस्ते पाण्याखाली! मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा
आभाळ फाटलं, मुंबई तुंबली! राज्यात पावसाचा हाहाकार, कुठे झाडं पडली, तर कुठे रस्ते पाण्याखाली! मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जुलै 2026 | बुधवार
मोठी बातमी! कोल्हापूरच्या चंदगडमध्ये 55 गावांचा हेरे सरंजाम प्रश्न कायमस्वरूपी निकाली, 22 हजार कुटुंबाना मालकी हक्क
मोठी बातमी! कोल्हापूरच्या चंदगडमध्ये 55 गावांचा हेरे सरंजाम प्रश्न कायमस्वरूपी निकाली, 22 हजार कुटुंबाना मालकी हक्क

व्हिडीओ

Gold-Silver Price Today : जुलैच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदी स्वस्त; जाणून घ्या आजचे नवे दर!
Zero Hour Full : खासदार, आमदारांच्या फुटीनंतर आता ठाकरेंनी आत्मचिंतन करायला हवं असं वाटतं का?
Uddhav Thackeray Special Report : ऑपरेशन टायगरनंतर उद्धव ठाकरे आत्मचिंतन करणार?
Raj Thackeray Special Report : फोडाफोडी, ऑपरेशनवर राज ठाकरेंची टीका, भाजपला इशारा
Satej Patil on Sachin Ahir : सचिन अहिर फुटले, आता सतेज पाटील म्हणतात...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
संतापजनक! चुकीच्या उपचारामुळे महिलेचा मृत्यू, पोटातील बाळही दगावले; नातेवाईकांचा रुग्णालयातच आक्रोश
संतापजनक! चुकीच्या उपचारामुळे महिलेचा मृत्यू, पोटातील बाळही दगावले; नातेवाईकांचा रुग्णालयातच आक्रोश
श्रीकांत शिंदेंच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले, उद्धव ठाकरेंची शिवसैनिकांना शाबासकी;फोनवरुन म्हणाले, तुमच्यासारख्या..
श्रीकांत शिंदेंच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले, उद्धव ठाकरेंची शिवसैनिकांना शाबासकी;फोनवरुन म्हणाले, तुमच्यासारख्या..
मोठी बातमी! कोल्हापूरच्या चंदगडमध्ये 55 गावांचा हेरे सरंजाम प्रश्न कायमस्वरूपी निकाली, 22 हजार कुटुंबाना मालकी हक्क
मोठी बातमी! कोल्हापूरच्या चंदगडमध्ये 55 गावांचा हेरे सरंजाम प्रश्न कायमस्वरूपी निकाली, 22 हजार कुटुंबाना मालकी हक्क
Rain Update: पुण्यातील बाजीराव रोडवर झाडपडी; मुंबईतही कारवर कोसळलं झाड, पुढील 3 दिवस पावसाचा जोर कायम
पुण्यातील बाजीराव रोडवर झाडपडी; मुंबईतही कारवर कोसळलं झाड, पुढील 3 दिवस पावसाचा जोर कायम
भारत आणि पाकिस्तानमधील 117 प्रमुख व्यक्तींचे मोदी आणि शहबाज यांना पत्र; म्हणाले, 'वैर संपवा आणि संवाद, द्विपक्षीय संबंध पुन्हा सुरू करा..'
भारत आणि पाकिस्तानमधील 117 प्रमुख व्यक्तींचे मोदी आणि शहबाज यांना पत्र; म्हणाले, 'वैर संपवा आणि संवाद, द्विपक्षीय संबंध पुन्हा सुरू करा..'
मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा इशारा; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, उद्या 2 जुलै रोजी शाळेला सुट्टी
मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा इशारा; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, उद्या 2 जुलै रोजी शाळेला सुट्टी
वायरी उघड्या, स्कुटीवरुन जाणाऱ्या दोन मुलींना करंट, रस्त्यावरच कोसळल्या; पावसाच्या पाण्यात 5 वाहने गेली वाहून
वायरी उघड्या, स्कुटीवरुन जाणाऱ्या दोन मुलींना करंट, रस्त्यावरच कोसळल्या; पावसाच्या पाण्यात 5 वाहने गेली वाहून
राज ठाकरेंच्या वक्तव्यावरुन हक्कभंग होऊ शकतो; फोडाफोडीचं राजकारण तापलं, राम कदमांचा मनसेप्रमुखांना इशारा
राज ठाकरेंच्या वक्तव्यावरुन हक्कभंग होऊ शकतो; फोडाफोडीचं राजकारण तापलं, राम कदमांचा मनसेप्रमुखांना इशारा
Embed widget