सांगली : देशातील नागरिकांच्या खात्यावर लवकरच 15 लाख रुपये जमा करण्यात येणार असल्याचं वक्तव्य केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. सांगली जिल्ह्यातील्या इस्लामपूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मोदी सरकारने निवडणूकीपूर्वी केलेल्या घोषणांपैकी काही घोषणा पूर्ण केल्या आहेत. नागरिकांच्या खात्यावर 15 लाख रुपये जमा करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने आम्हाला कोणतेही पैसे दिले नसून यात काही तांत्रिक अडचण येत असल्याचेही आठवले म्हणाले. रिझर्व्ह बँकेशी याबाबतची बोलणी सुरु असून लवकरच पैसे जमा होतील असं आश्वासन आठवले यांनी दिलं आहे.
नुकत्याच झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने सत्ता स्थापन केली, पण येत्या निवडणुकीत आम्हीच सत्तेत येऊ आणि राहिलेल्या तीन ते चार महिन्यात काँग्रेसची हवा काढू असं वक्तव्य आठवले यांनी केलं आहे.
पुन्हा देशांत नरेंद्र मोदींची सत्ता आणू आणि नरेंद्र मोदी यांनाच पंतप्रधान बनवू असेही आठवले म्हणाले. सोनवारी सांगलीच्या इस्लामपूर मध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत प्रसार माध्यमांशी ते बोलत होते.
पाच राज्याच्या निवडणुकीत मिळालेल्या अपयशावर भाजप सरकार चिंतन करत आहे. आगामी निवडणुकीसाठी भाजप-सेनेने एकत्र आले पाहिजे. दोन्ही पक्षांना एकत्र आणण्यासाठी नेहमीच माझी मध्यस्थ्याची भूमिका राहीली आहे. तसेच सर्व घटक पक्षांना एकत्र आणण्यासाठी मध्यस्थी करणार असल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले.
नागरिकांच्या खात्यात लवकरच 15 लाख रुपये : रामदास आठवले
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
18 Dec 2018 11:35 AM (IST)
नुकत्याच झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने सत्ता स्थापन केली पण येत्या निवडणुकीत आम्हीच सत्तेत येऊ आणि राहिलेल्या तीन ते चार महिन्यात काँग्रेसची हवा काढू असं वक्तव्य आठवले यांनी केलं आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -