बीड : बहिणीची छेड काढल्यावरुन झालेल्या भांडणातून जाब विचारणाऱ्या अल्पवयीन मुलाची मित्रांनीच हत्या केल्याची घटना बीडमध्ये समोर आली आहे. विशेष म्हणजे हत्येनंतर आरोपींनी अपहरणाचा बनाव केला. पण पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावलाच.
बीडच्या केरुळ गावातला 14 वर्षांचा गणेश आंधळे 12 डिसेंबरला बेपत्ता झाला. गणेशच्या आईने आष्टी पोलिसात याची तक्रारही दिली. दोन दिवसांनी गावातल्याच एका दगडावर एक चिठ्ठी आढळून आली. यामध्ये 20 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली होती.
याच काळात गणेशचा मृतदेहही आढळला. गणेश हा ऊसतोड मजूराचा मुलगा. खंडणीसाठी गणेशचं अपहरण कोण आणि का करेल असा संशय पोलिसांना आला आणि त्यानंतर तपासाची चक्रे फिरली.
गणेशची हत्या केल्याची कबुली त्याच्या दोन अल्पवयीन मित्रांनी दिली आहे. दोन्ही आरोपी गणेशच्याच शाळेत शिकत होते. गणेशच्या बहिणीला दोघे आरोपी त्रास देत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. यातून तिघांची भांडणं झाली आणि या सख्ख्या भावांनी गणेशचा जीव घेतला.
आतापर्यंत अशा हत्यांचा बनाव आपण फक्त क्राईम शोमध्ये पाहिला आहे. पण याचं लोण आता बीडसारख्या ग्रामीण भागातही पोहचलंय, हे धोकादायक आहे.
बहिणीची छेड काढल्याने भांडण, जाब विचारणाऱ्या विद्यार्थ्याला संपवलं
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
17 Dec 2018 11:18 PM (IST)
गणेशच्या आईने आष्टी पोलिसात याची तक्रारही दिली. दोन दिवसांनी गावातल्याच एका दगडावर एक चिठ्ठी आढळून आली. यामध्ये 20 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली होती.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -