एक्स्प्लोर

मराठमोळ्या अभय आष्टेकर यांना मानाचा आईनस्टाईन पुरस्कार

अमेरिकन फिजिकल सोसायटीद्वारे महान संशोधक अल्बर्ट आईनस्टाईन यांच्या नावे हा पुरस्कार दिला जातो.

शिकागो : अमेरिकेतील मानाचा आईनस्टाईन पुरस्कार यंदा कोल्हापूरकराला प्राप्त झाला आहे. भारतीय वंशाचे अमेरिकन प्राध्यापक अभय आष्टेकर यांना गुरुत्वाकर्षण विज्ञान क्षेत्रातील शोधासाठी हा पुरस्कार देण्यात येणार आहे. अमेरिकन फिजिकल सोसायटीद्वारे महान संशोधक अल्बर्ट आईनस्टाईन यांच्या नावे हा पुरस्कार दिला जातो. 10 हजार डॉलर असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. 1999 पासून महान वैज्ञानिक अल्बर्ट आईन्स्टाईन यांच्या नावे हा पुरस्कार देण्यात येतो. सध्या आष्टेकर पेन्सिल्व्हानिया स्टेट युनिव्हर्सिटीतील ग्रॅव्हिटेशन आणि द कॉसमॉसमध्ये संचालक म्हणून कार्यरत आहेत. अभय आष्टेकर यांनी सामान्य सापेक्षता, ब्लॅक होल सिद्धांत आणि क्वांटम फिजिक्स या क्षेत्रातील मोलाचं संशोधन केलं आहे. कोल्हापूरमध्ये जन्म अभय आष्टेकर यांचा जन्म 5 जुलै 1949 रोजी कोल्हापूर जिल्ह्यात झाला. त्यांचं बालपण आणि शिक्षण मुंबईत झालं. पुढे गुरुत्वाकर्षण विषयातील पदवी त्यांनी ऑस्टिनमधील टेक्सास विद्यापीठातून प्राप्त केली. मग शिकागो विद्यापीठातून पीएचडी मिळवली. त्यानंतर त्यांनी अनेक नामांकित विद्यापीठात अध्यापनाचं काम केलं. पुरस्काराने आनंद अभय आष्टेकर यांनी मानाचा अल्बर्ट आईन्स्टाईन पुरस्कार घोषित झाल्याने आनंद व्यक्त केला आहे. "शाळेत न्यूटनचा सिद्धांत आणि गुरुत्वाकर्षणाची माहिती मिळाली होती. ज्या शक्तीमुळे कोणतीही वस्तू जमिनीवरच येते, त्या गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वी सूर्यभोवती फिरते. हे सर्व आश्चर्यकारक होतं. त्यामुळेच मी हे समजून घेण्याचं ठरवलं होतं”, असं आष्टेकर यांनी सांगितले. भारतीय वैज्ञानिक भौतिक आणि खगोलशास्त्रात उत्तम काम करत आहेत. या क्षेत्रात ते चीनपेक्षाही पुढे आहेत, असंही आष्टेकर यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या

Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
देशात सर्वाधिक साखर उत्पादन करणारी राज्य कोणती? महाराष्ट्राचा कितवा नंबर? जाणून घ्या संपूर्ण यादी 
देशात सर्वाधिक साखर उत्पादन करणारी राज्य कोणती? महाराष्ट्राचा कितवा नंबर? जाणून घ्या संपूर्ण यादी 

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhuleshwarcha Raja : मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात,आगमन मिरवणुकीत घडला प्रकार, तीन जण जखमी
मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत दुर्घटना, अपघातात तीन जण जखमी
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
Embed widget