Corona Vaccine Drive: : कोरोना लसीकरणाचा उद्या शुभारंभ; राज्यात 285 केंद्रावर तयारी पूर्ण
राज्याला कोविशील्ड लसीचे 9 लाख 63 हजार डोसेस आणि कोवॅक्सिन लसीचे 20 हजार डोसेस प्राप्त झालेले असून ते सर्व जिल्ह्यांपर्यंत पोहोचवण्यात आले आहेत.

मुंबई : राज्यात उद्या, 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरण मोहीम सुरु होत आहे. त्यासाठी केंद्र शासनाच्या निर्देशानुसार 285 केंद्रांवर तयारी पूर्ण झाली आहे. प्रत्येक केंद्रावर 100 प्रमाणे सुमारे 28 हजार 500 आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरणाचे नियोजन करण्यात आले आहे. ज्यांना लस देण्यात येणार आहे त्यांना आज सायंकाळपर्यत मेसेज पाठवण्याचे काम सुरू होते. या मेसेजमध्ये संबंधित व्यक्तीला किती वाजता, कोणत्या केंद्रावर, कुठल्या कंपनीची लस दिली जाणार याची माहिती देण्यात आली आहे, असे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली.
एका लसीकरण केंद्रावर लसीकरणासाठी 5 जणांचे पथक तैनात करण्यात आले आहे. दरम्यान, लसीकरणाच्या शुभारंभ प्रसंगी देशातील अन्य राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातील कूपर हॉस्पिटल, मुंबई आणि जालना जिल्हा रुग्णालयातील लसीकरण सत्राची पंतप्रधान दूरचित्रवाणीद्वारे माहिती घेतील. यादोन्ही ठिकाणी दूरचित्रवाणी संवादाची यंत्रणा तयार करण्यात आली आहे. राज्याला कोविशील्ड लसीचे 9 लाख 63 हजार डोसेस आणि कोवॅक्सिन लसीचे 20 हजार डोसेस प्राप्त झालेले असून ते सर्व जिल्ह्यांपर्यंत पोहोचवण्यात आले आहेत.
कोवॅक्सीन लस ही राज्यातील 6 ठिकाणी देण्यात येणार आहे. त्यामध्ये 4 वैद्यकीय महाविद्यालये मुंबई, औरंगाबाद, सोलापूर आणि नागपूर आणि 2 जिल्हा रुग्णालयांचा पुणे आणि अमरावती यांचा समावेश आहे. दररोज सकाळी 9 ते सायंकाळी 5 यावेळेत लसीकरण केले जाईल.
Before You Go
Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा
महत्त्वाच्या बातम्या






















