इंदापूर : एकीकडे टोलप्रश्नी वाहनचालकांचा संताप होत असल्याची उदाहरणं पाहायला मिळतात, मात्र इंदापूरमध्ये पोलिस कर्मचाऱ्याने याचं टोक गाठल्याचं समोर आलं आहे. खाजगी गाडीकडे टोल मागितला म्हणून पोलिस निरीक्षकाने टोल कर्मचाऱ्यावर रिव्हॉल्वर रोखून बेदम मारहाण केली आहे.


 
पोलिस निरीक्षकासोबत आसलेल्या गुंडांनीही टोल कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची माहिती आहे. मारहाणीचा हा सर्व प्रकार टोलनाक्यावरील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

 
पुणे-सोलापूर रोडवरील इंदापूरजवळच्या सरडेवाडी टोलनाक्यावर हा प्रकार घडला. पीडित टोल कर्मचाऱ्याने पुणे पोलिस अधीक्षकांकडे यासंदर्भात तक्रार केली आहे.