नागपूर : जे दुरुन महान वाटतात, ते प्रत्यक्षात खूप लहान असतात, असं मिष्किल वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. नागपुरातील लक्ष्मणरावर मानकर ट्रस्टच्या एकल विद्यालयात शिक्षकांच्या शिबिरात ते बोलत होते.


 
आपले राजकीय अनुभव मांडताना गडकरींनी अनेक उदाहरणं दिली. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पातळीवर अनेक जण भेटतात. त्यांना भेटल्यावर लक्षात येतं की, जे दुरुन मोठे वाटतात ते मुळात खूप लहान असतात. दिल्लीतील राजकारणाच्या बाबतीतलं गडकरींचं विधान नेमकं कुणाबद्दल होतं हे गुलदस्त्यातच आहे.

 
दरम्यान या शिबिराला गडकरींसोबत सुप्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनीही हजेरी लावली होती. प्रत्येक जण शिवाजी व्हायला नको, अनेकांना मावळेही बनावं लागतं, कारण राज्य मावळ्यांनीच टिकवलं होतं असं सांगून नाना पाटेकर यांनी आदिवासी भागातील शिक्षकांना प्रोत्साहन दिलं.