इंदापूर, पुणे : इंदापूर तालुक्यात शेतकऱ्यांची युरिया (Uria pesticide) खतासाठी खत विक्रेते (Pune Indapur news) केंद्र चालकांकडून (Agriculture) अडवणूक केली जात असल्याचा एक व्हिडीओ (Video Viral) समोर आला आहे. बारामती (baramati) खरेदी विक्री संघाच्या अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या इंदापूर तालुक्यातील (Indapur taluka) भवानीनगर येथील खत विक्री केंद्रातील हा व्हिडीओ आहे. मात्र सर्वच खत विक्रेत्यांकडून युरिया खताच्या गोणीवर इतर लिंकिंग खत दिलं जात आहे. मोठ्या खत विक्रेत्या कंपन्या खत विक्रेत्यांना इतर खते लिंक करुन देत असल्यानं खत विक्रेत्यांचा नाईलाज होतोय. कोणाही शेतकऱ्याला (Pune Farmer) दहा-वीस पोती युरिया पाहिजे असेल तर त्याला स्वतंत्र युरिया सध्या इंदापूरच्या बाजारात (Indapur Market) मिळत नाही अशी स्थिती आहे.


शेतकऱ्यांना युरिया खताची आवश्यकता असताना युरिया खतांसोबत इतर द्रव खते खरेदी केली तरच युरिया हे खत दिले जात असल्याचं या व्हिडीओ मधून दिसत आहे. युरियाचं लिंकिंग कसं होतं? हे या व्हिडीओ मधून समोर आलं आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते राजेंद्र निंबाळकर यांनी हा व्हिडीओ चित्रित केला आहे. बारामती तालुका खरेदी विक्री संघ हा शेतकऱ्यांसाठीच काम करणारा संघ आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओची सत्यता पडताळण्याची गरज आहे. युरियाच्या गोणी बरोबर आम्ही नॅनो युरिया देत आहोत हे शासनाचेच धोरण आहे. आम्ही स्वतः संस्था म्हणून कोणतीही गोष्ट युरिया सोबत मुद्दाम होऊन देत नाही. संघ एखाद्या शेतकऱ्याला वीस किंवा 25 बॅग केवळ युरिया द्यायचा म्हटलं तर ते संघाला शक्य नाही. प्रत्यक्ष शेतकऱ्याला युरिया मिळाला पाहिजे, असं बारामती तालुका खरेदी-विक्री संघाचे व्यवस्थापक निलेश लोणकर यांनी म्हटलं आहे.


पावसाळी अधिवेशनादरम्यान विधिमंडळात खतांच्या लिंकिंगसह अनेक प्रश्न उपस्थित करून कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर कृषीमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांनी कारवाईचे संकेत दिले होते. ज्या कंपन्या इतर खते लिंकिंग करतात अशा कंपन्यांना शासनाकडून नोटीसही देण्यात आल्या होत्या. मात्र अद्याप देखील युरिया बरोबर विद्राव्य खतांचे लिंकिंग असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे कृषीमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी आता या बाबीकडे अधिक लक्ष घालण्याची गरज आहे.


इतर महत्वाची बातमी-


Onion : आजपासूनच कांदा खरेदीला सुरुवात, आवश्यकता भासल्यास अधिकचा कांदाही खरेदी करणार : पियूष गोयल