Indapur NCP News : इंदापुरात (Indapur) राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) गटात फुट पडली की काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कारण हर्षवर्धन पाटील, दत्तात्रय भरणे आणि शरद पवार गटाच्या बॅनरबाजी नंतर इंदापुरात पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अध्यक्ष प्रदीप गारटकर (Pradeep Garatkar) यांचेही भावी आमदार म्हणून बॅनर झळकले आहेत. यावर बॅनरवर लक्ष नाही फिक्स आहे 2024 प्रदीप दादा गारटकर आमदार साहेब असा मजकूर लिहिण्यात आला आहे. तसेच यावर सर्व नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी इंदापूर असं नमूद करण्यात आलं आहे. याआधी दत्तात्रय भरणे यांचे देखील भावी आमदार म्हणून फ्लेक्स लागले आहेत.


आमचं ठरत नसतं आमच फिक्स असतं, आमदार दत्तात्रय भरणेंचा बॅनर 


मागील दोनच दिवसापूर्वी इंदापुरात आमदार दत्तात्रय भरणे यांचे एक बॅनर लागले होते. या बॅनरची देखील जोरदार चर्चा सुरु होती. या बॅनरवर आमचं ठरत नसतं आमच फिक्स असतं असा मजकूर लिहण्यात आला आहे. इंदापूर राष्ट्रवादीकडून हा बॅनर लावण्यात आला होता. यानंतर आता लगेच पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अध्यक्ष प्रदीप गारटकर यांचाही बॅनर लागला आहे. यावर लक्ष नाही फिक्स आहे 2024 प्रदीप दादा गारटकर आमदार साहेब असा मजकूर लिहला आहे.  


भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांचेही लागले होते बॅनर


आमचा स्वाभिमान आमचे विमान, आमचं आता ठरलंय, तयारी लागा", अशा आशयाचे बॅनर इंदापुरात (Indapur) झळकले आहेत. भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या समर्थकांनी हे बॅनर लावले होते. याची देखील सर्वत्र चर्चा होती. यापूर्वी हर्षवर्धन पाटील दोन वेळेस विमान चिन्हावर अपक्ष निवडणूक लढले आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक हर्षवर्धन पाटील (Harshwardhan Patil) अपक्ष लढणार का? असा सवाल उपस्थित केला जातोय. 


इंदापूरची जागा कोणाच्या वाट्याला?


सध्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते दत्तात्रय भरणे इंदापूरचे आमदार आहेत. तर भाजप नेते हर्षवर्धन पाटीलही इंदापुरातून विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक असणार आहेत. त्यामुळे विधानसभेला इंदापूरची जागा कोणाला सुटणार याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता नाही. मात्र, महायुतीचे वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील, तो मला मान्य असेल, असं दत्तात्रय भरणे यांनी म्हटलं होतं. हर्षवर्धन पाटील यांनी 2019 ची विधानसभा निवडणूक भाजपकडून लढवली होती. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दत्तात्रय भरणे यांना त्यांच्याविरोधात मैदानात उतरवले होते. या निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांचा पराभव झाला होता. दत्तात्रय भरणे यांनी 114,960 मतं खेचून आणली होती. तर हर्षवर्धन पाटलांना 111,850 मतं पडली होती. त्यामुळे हर्षवर्धन पाटलांचा 3,110 मतांनी पराभव झाला होता. त्यानंतर हर्षवर्धन पाटील आणि भरणे यांच्यामधील संघर्ष गेल्या 5 वर्षात वाढला आहे. 


महत्वाच्या बातम्या:


Indapur : आमचा स्वाभिमान आमचे विमान, इंदापुरात बॅनर झळकले, हर्षवर्धन पाटील विधानसभा अपक्ष लढणार?