Shivsena Corporator Yashwant Jadhav : गेले 24 तास उलटून गेले तरी अद्याप शिवसेना नेते व मुंबई महानगर पालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी आयकर विभागाची छापेमारी सुरूच आहे. शुक्रवारी सकाळपासून आयकर विभागाची छापेमारी सुरू झाली होती. दरम्यान, याविरोधात चिडलेल्या शिवसैनिकांनी आयकार विभागाच्या छापेमारीविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. मध्यरात्री यशवंत जाधव यांना घरातून बाहेर काढल्याचे समझल्यावर शिवसैनिक मोठ्या संख्येने यशवंत जाधव यांच्या घराच्या बाहेर एकत्र आले होते.
शिवसैनिकांनी आयकार विभागाचे छापेमारीचा निषेध केला आहे. गेल्या 24 तासाहून अधिक काळ झाले आयकर विभागाचे अधिकारी यशवंत जाधव यांच्या घरी चौकशी करत आहेत. या विरोधात शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. स्थानिक पोलिसांनी त्यांना समजून शांत केले, तरी रात्रीपासून शिवसैनिक यशवंत जाधव यांच्या घराबाहेर बसून आहेत. यशवंत जाधव यांच्या घरावर आयकर विभागाने शुक्रवारी सकाळपासूनच छापेमारी सुरू केली होती.
यशवंत जाधव यांना घरातून बाहेर काढणार असल्याचं समजल्यावर शिवसैनिक मोठ्या संख्येने यशवंत जाधव यांच्या घराच्या बाहेर एकत्र झाले झाले होते. त्यामुळे माझगाव परिसरात पोलिस बंदोवस्त अधिक वाढवण्यात आला आहे. आयकर विभागाला चौकशी करीत असताना कोणताही त्रास होऊ नये यासाठी पोलिस बंदोवस्त ठेवण्यात आला आहे. काल मुंबईच्या महापौर यांनी यशवंत जाधव यांच्या घराजवळ आल्याचे पाहायला मिळाले. त्या म्हणाल्या की शिवसैनिक अधिक आक्रमक आहे, तसेच त्यांच्याकडून चुकूनही कोणतं कृत्य होऊ नये म्हणून मी या परिसरात आले आहे. त्याचबरोबर त्यांनी त्यांची खुशाल चौकशी करावी. ते आयकर विभागाच्या छापेमारीला योग्य उत्तर देतील असेही किशोरी पेडमेकर यांनी सांगितले होते.
जानेवारी महिन्यात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी यशवंत जाधव यांनी कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. मुंबईतील कोविड सेंटर उभारणीत मोठा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. तसेच यामध्ये मनी लॉन्ड्रिंग केल्याचा गंभीर आरोपही सोमय्यांनी जाधवांवर केला होता. एवढंच नाहीतर आयकर विभागाच्या हाती पुरावे लागले आहेत. जाधव यांचं पितळ उघडं करण्यासाठी आयकर विभागाला पाठपुराव्यास मदत करणार असल्याचंही किरीट सोमय्या म्हणाले होते. त्यानंतर दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप झाल्याचे पाहायला मिळाले होते.
दरम्यान, आगामी महापालिका निवडणुकांच्या निवडणुकांच्या तोंडावर शिवसेना नेते यशवंत जाधवांच्या घरी आयकर विभागानं छापा टाकला आहे. यशवंत जाधव यांच्या माझगाव येथील घरी आयकर विभागानं छापा घातला आहे. त्यामुळे या छापेमारीमध्ये यशवंत जाधव यांच्या घरातून आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांच्या हाती काय लागते हे पाहणे महत्त्वाचे आहे.
महत्त्वाच्या बातम्या: