लातूर : लातूरच्या विशालनगरमध्ये 19 वर्षीय तरुणीची राहत्या घरात चाकूनं भोसकून हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अपूर्वा यादव असं या मृत तरुणीचं नाव आहे. अपूर्वाची हत्या झाली त्यावेळी घरात कोणीही नव्हते.


घटना घडली त्यावेळी अपूर्वाची आई देवदर्शनासाठी बाहेर गेली होती. वडीलांचं मेडिकल दुकान असल्याने तेही कामानिमित्त बाहेरगावी होते. अपूर्वा घरात एकटी असताना तिची हत्या करण्यात आली. अपूर्वाची आई घरी त्यावेळी अपूर्वाला रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं पाहिलं. त्यानंतर तिला तात्काळ लातूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.


अपूर्वा कर्नाटकात वैद्यकीय शिक्षण घेत होती. काही दिवसांपूर्वीच ती लातुरात आपल्या घरी आली होती. मात्र चाकूनं भोसकून तिची हत्या झाली. हत्या नेमकी कोणी केली? आणि का केली? याचा तपास पोलीस करत आहेत. पोलिसांनी या हत्येप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. एमआयडीसी पोलिसांची दोन पथकं सध्या या गुन्ह्याच्या तपासासाठी तयार करण्यात आली आहेत.


यादव परिवारातील एकुलती एक असलेल्या या निरागस मुलीचा अश्या प्रकारे खून झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.