एक्स्प्लोर

अवैध दारु तस्करांची महिलांना मारहाण, पोलिसांच्या गाडीवरही दगडफेक

महिला दारु तस्करांना घेऊन शिरपूर पोलीस स्टेशनकडे जात असताना दारु विक्रेत्यांनी आणि त्यांच्या साथीदारांनी कुराई गावाजवळ अडवून महिलांना मारहाण केली. शिवाय दारु तस्करीसाठी वापरण्यात आलेली दुचाकीही पेटवून दिली.

यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यातील ढाकोरी गावातील महिलांनी दुचाकीवरुन अवैध दारु तस्करी करणाऱ्यांना पकडले असता तस्करांनी महिलांना मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या मारहाणीत एका महिलेला गंभीर दुखापत झाली आहे. शिवाय दारु विकेत्यांनी पोलिसांच्या गाडीवरही दगडफेक केल्याची माहिती मिळाली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील अनेक गाव अवैध दारू विक्री मुळे त्रस्त आहेत. यवतमाळ जिल्ह्याच्या शेजारी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी आहे. अशावेळी चोरट्या पद्धतीने अवैध दारू विक्रेते दारू तस्करी करतात. दुचाकीवरुन अवैध दारु तस्करी केली जात आहे, अशी माहिती ढाकोरी गावातील महिलांना मिळाली. ढाकोरी गावातील महिलांनी एकत्र येत (शुक्रवारी) रात्री 9 वाजताच्या सुमारास दारु तस्करी करणाऱ्यांना पकडले. यावेळी या महिला दारु तस्करांना घेऊन शिरपूर पोलीस स्टेशनकडे जात असताना दारु विक्रेत्यांनी आणि त्यांच्या साथीदारांनी कुराई गावाजवळ अडवून महिलांना मारहाण केली. शिवाय दारु तस्करीसाठी वापरण्यात आलेली दुचाकीही पेटवून दिली. मारहाणीची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले असता दारु विक्रेत्यांनी पोलिसांच्या गाडीवर दगडफेक केली. त्यादरम्यान पोलिसांनी गाडीतून पळ काढला. संधी साधून दारू विक्रेत्यांनी पोलिसांची गाडी उलटवून दिली. त्यानंतर मोठ्या फौजफाट्यासह पोलीस कुराई गावात पोहोचले. त्यादरम्यान पोलिसांनी काही दारु विक्रेत्यांना ताब्यात घेतले. दारु विक्रेत्यांकडून झालेल्या मारहाणीमध्ये सहा महिला जखमी झाल्या असून एका महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. सध्या महिलांचे जवाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरु आहे. अवैध दारू विक्रेत्यांची पोलीस धरपकड करीत आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Weather Updates Rain Marathi News: राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती
राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती
Tukaram Mundhe Marathi News: बारमध्ये प्यायला बसल्यावर रात्री FDA ला फोन आला; पुढे जे घडलं तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, एकच हशा पिकला!
बारमध्ये प्यायला बसल्यावर रात्री FDA ला फोन आला; पुढे जे घडलं तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, एकच हशा पिकला!
Nashik Earthquake Marathi News: नाशिकमध्ये 4.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूंकप, अनेकांच्या घराच्या भिंतीला तडे; रात्री 10 वाजता जमीन थरथरली, नेमकं काय घडलं?
नाशिकमध्ये 4.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूंकप, अनेकांच्या घराच्या भिंतीला तडे; रात्री 10 वाजता जमीन थरथरली, नेमकं काय घडलं?
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल

व्हिडीओ

Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe Marathi News: बारमध्ये प्यायला बसल्यावर रात्री FDA ला फोन आला; पुढे जे घडलं तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, एकच हशा पिकला!
बारमध्ये प्यायला बसल्यावर रात्री FDA ला फोन आला; पुढे जे घडलं तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, एकच हशा पिकला!
Nashik Earthquake Marathi News: नाशिकमध्ये 4.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूंकप, अनेकांच्या घराच्या भिंतीला तडे; रात्री 10 वाजता जमीन थरथरली, नेमकं काय घडलं?
नाशिकमध्ये 4.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूंकप, अनेकांच्या घराच्या भिंतीला तडे; रात्री 10 वाजता जमीन थरथरली, नेमकं काय घडलं?
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
Embed widget