मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात जमीन हडप प्रकरणातला आरोपी पहिल्या रांगेत
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
04 Jun 2017 08:43 PM (IST)
NEXT
PREV
नागपूर : जमीन हडप प्रकरणी दोन गुन्हे दाखल असलेला भाजप नगरसेवक जगदीश ग्वालबंसीचा सध्या नागपूर पोलीस शोधत घेत आहेत. पण तोच आरोपी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्र्यांच्या कार्यक्रमात पहिल्या रांगेत बसल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे नागपूर पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
नागपुरात आज दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मेळाव्याचं आयोजन केलं होतं. या मेळाव्याला केंद्रीय सामाजिक न्याय विभागाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गहलोत आणि केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी हे उपस्थीत होते. पण या कार्यक्रमात प्रेक्षकांच्या पहिल्याच रांगेत सर्वात समोर भाजप नगरसेवक जगदीश ग्वालबंसी बसला होता.
जगदीश ग्वालबंसी याच्या विरोधात नागपूर पोलिसांनी काही दिवसांपूर्वी लोकांना धमकावून, त्यांच्या जमिनी हडप केल्याचे दोन गुन्हे दाखल केले आहेत. या दोन्ही प्रकरणात नागपूर पोलिसांनी जगदीश ग्वालबंसीला अद्याप अटक झालेली नाही.
विशेष म्हणजे, आज तोच जगदीश ग्वालबंसी मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात पहिल्याच रांगेत बिंधास्त बसलेला दिसला. त्यामुळे नागपूर पोलिसांनी डोळे मिटले आहे का? की नागपूर पोलीस गुन्हेगारांना अभय देत आहेत, असे प्रश्न उपस्थीत होत आहेत.
दरम्यान, याच कार्यक्रमात दुधाच्या हमीभावावरुन गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांना पोलिसांनी अडवले. पण तरीही गोंधळ न थांबल्याने पोलिसांनी गोंधळ घालणाऱ्या शेतकऱ्यांना ताब्यात घेतलं होतं.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -