एक्स्प्लोर

मनी लाँडरिंग झालं असेल तर चौकशी होणारच : मुख्यमंत्री

मुंबई: ‘किरीट सोमय्यांनी शिवसेना नेत्यांवर केलेले मनी लाँडरिंगचे आरोप गंभीर आहेत. त्यात तथ्य आढळलं तर कारवाई केली जाईल.’ असं विधान मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. ‘एबीपी माझा’ला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. छगन भुजबळ आणि शिवसेना नेत्यांनी एकाच कंपन्यांमधून मनी लाँडरिंग केल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला होता. त्यात कंपन्यांची नावंही जाहीर केली होती. तसंच हे आरोप करताना थेटपणे उद्धव ठाकरेंचं नाव घेणं टाळून त्यांच्या चार्टर्ड अकाऊंटंट आणि इतर नेत्यांचा उल्लेख केला होता. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी केलेली चौकशीची घोषणा कुणापर्यंत जाणार याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले? "सोमय्यांनी केलेले आरोप गंभीर आहेत. त्यांनी काही कागदपत्र सादर केले आहेत. या कंपन्यांमध्ये मनी लाँडरिंग झालं आहे. त्यांनी उद्धवजींना हे विचारलं की याच्याशी शिवसेनेच्या काही नेत्यांशी संबंध आहे का? असतील तर कोण आहेत? त्यांच्यावर कारवाई करणार आहात का? यानंतर मी सोमय्यांना सांगितलं, की याचा राजकीय उपयोग करु नका. तुम्ही संबंधित विभागाला ही कागदपत्रं सोपवा. संबंधित यंत्रणा त्याच्यावर कारवाई करेल" असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसंच जर मनी लाँडरिंग झालं असेल तर चौकशी तर होणारच, असं मुख्यमंत्र्यांनी ठणकावून सांगितलं. काय आहे किरीट सोमय्यांचा आरोप? मनी लाँडरिंगप्रकरणी जेलमध्ये असेलेले माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आणि शिवसेनेच्या नेत्यांनी एकाच कंपन्यांमधून मनी लाँडरिंग केल्याचा गंभीर आरोप भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. ‘उद्धव ठाकरे स्वत:ची संपत्ती का जाहीर करत नाही? त्यांना एवढी कसली भीती वाटते?’ असं म्हणत सोमय्यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. याआधी किरीट सोमय्यांनी सात कंपन्यांची यादी जाहीर केली होती. या कंपन्यांशी शिवसेना नेत्याचे  लागेबांधे असल्याचा आरोप केला होता. संबंधित बातम्या भुजबळ आणि शिवसेना नेत्यांचं एकाच कंपनीत मनी लाँडरिंग: सोमय्या उद्धव ठाकरेंचे सात कंपन्यांशी आर्थिक लागेबांधे, सोमय्यांचा आरोप सोमय्यांनी आधी अमित शाहांची संपत्ती जाहीर करावी: राहुल शेवाळे उद्धव ठाकरेंनी संपूर्ण कुटुंबाच्या संपत्तीचं ऑडिट करावं: सोमय्या

महत्त्वाच्या बातम्या

Ratnagiri News: दापोलीच्या हर्णे राजवाडीत पुन्हा दरडीचे भीषण संकट, बेकायदेशीर उत्खननामुळे 60 कुटुंबे धोक्यात; 2010 च्या 8 बळींच्या आठवणीने ग्रामस्थ धास्तावले
दापोलीच्या हर्णे राजवाडीत पुन्हा दरडीचे भीषण संकट, बेकायदेशीर उत्खननामुळे 60 कुटुंबे धोक्यात; 2010 च्या 8 बळींच्या आठवणीने ग्रामस्थ धास्तावले
Maharashtra Weather Rain Updates: अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा, राज्यात पुन्हा धो धो पाऊस कोसळणार; कोकणात पावसाला सुरुवात, मान्सूनची A टू Z माहिती
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा, राज्यात पुन्हा धो धो पाऊस कोसळणार; कोकणात पावसाला सुरुवात, मान्सूनची A टू Z माहिती
Maharashtra Live blog updates: मुंबईत पुन्हा झाड कोसळले; पवई IIT मार्केटमध्ये कारचे नुकसान, चालक किरकोळ जखमी
मुंबईत पुन्हा झाड कोसळले; पवई IIT मार्केटमध्ये कारचे नुकसान, चालक किरकोळ जखमी
Pune Crime Khalil Shaikh: खलील शेखने आयुष्य संपवण्यापूर्वी लिहलेली चिठ्ठी पोलिसांना सापडली, अटकेची शक्यता, रवींद्र धंगेकरांच्या अडचणी वाढणार?
खलील शेखने आयुष्य संपवण्यापूर्वी लिहलेली चिठ्ठी पोलिसांना सापडली, अटकेची शक्यता, रवींद्र धंगेकरांच्या अडचणी वाढणार?

व्हिडीओ

Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ratnagiri News: दापोलीच्या हर्णे राजवाडीत पुन्हा दरडीचे भीषण संकट, बेकायदेशीर उत्खननामुळे 60 कुटुंबे धोक्यात; 2010 च्या 8 बळींच्या आठवणीने ग्रामस्थ धास्तावले
दापोलीच्या हर्णे राजवाडीत पुन्हा दरडीचे भीषण संकट, बेकायदेशीर उत्खननामुळे 60 कुटुंबे धोक्यात; 2010 च्या 8 बळींच्या आठवणीने ग्रामस्थ धास्तावले
Maharashtra Weather Rain Updates: अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा, राज्यात पुन्हा धो धो पाऊस कोसळणार; कोकणात पावसाला सुरुवात, मान्सूनची A टू Z माहिती
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा, राज्यात पुन्हा धो धो पाऊस कोसळणार; कोकणात पावसाला सुरुवात, मान्सूनची A टू Z माहिती
Sonam Wangchuk: सोनम वांगचुक म्हणाले, 'सोमवारपर्यंत जिवंत राहायचंय..' उपोषण सुरू ठेवल्यास अवयव निकामी होण्याचा धोका, परिस्थिती गंभीर असल्याचा डॉक्टरांचा इशारा
सोनम वांगचुक म्हणाले, 'सोमवारपर्यंत जिवंत राहायचंय..' उपोषण सुरू ठेवल्यास अवयव निकामी होण्याचा धोका, परिस्थिती गंभीर असल्याचा डॉक्टरांचा इशारा
Rohini Khadse: फडणवीसजी-शिंदे साहेब 2100-1500 सोडा, लाडक्या बहिणींसाठी तुम्हाला साडीही परवडत नाही का? रोहिणी खडसेंचा सवाल
फडणवीसजी-शिंदे साहेब 2100-1500 सोडा, लाडक्या बहिणींसाठी तुम्हाला साडीही परवडत नाही का? रोहिणी खडसेंचा सवाल
Monsoon Session: संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा अजेंडा निश्चित; खासदार फोडाफोडीने चर्चेत आलेलं वादग्रस्त मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा मांडणार की नाही?
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा अजेंडा निश्चित; खासदार फोडाफोडीने चर्चेत आलेलं वादग्रस्त मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा मांडणार की नाही?
Satej Patil on Jayant Patil: जयंतराव 'उजव्या वळणावर' येऊन ठेपल्याची चर्चा शिगेला पोहोचली; सतेज पाटील सूचक वक्तव्य करत काय म्हणाले?
जयंतराव 'उजव्या वळणावर' येऊन ठेपल्याची चर्चा शिगेला पोहोचली; सतेज पाटील सूचक वक्तव्य करत काय म्हणाले?
ख्रिस्ती धर्मामध्ये धर्मांतर केल्यानंतरही अनुसूचित जमातीचे लाभ; सरकार मोठ्या निर्णयाच्या तयारीत, तब्बल 27 जणांची जम्बो समिती नेमली
ख्रिस्ती धर्मामध्ये धर्मांतर केल्यानंतरही अनुसूचित जमातीचे लाभ; सरकार मोठ्या निर्णयाच्या तयारीत, तब्बल 27 जणांची जम्बो समिती नेमली
Iran War Live Update: अमेरिकेचा सलग सहाव्या दिवशी इराणवर हवाई हल्ला सुरुच, भारताची कोट्यवधी डाॅलरची गुंतवणूक असलेल्या चाबहार पोर्टवर सुद्धा तिसऱ्यांदा हल्ला
अमेरिकेचा सलग सहाव्या दिवशी इराणवर हवाई हल्ला सुरुच, भारताची कोट्यवधी डाॅलरची गुंतवणूक असलेल्या चाबहार पोर्टवर सुद्धा तिसऱ्यांदा हल्ला
Embed widget