Ladki Bahin Yojana नागपूरराज्यात सध्या महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेचा (CM Ladki Bahin Yojana) बोलबाल सुरू आहे. अनेक ठिकाणी या योजनेचे कार्यक्रम, शुभारंभ केले जात आहेत. या योजनेला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासह राज्य सरकारची अतिशय महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरुन राज्याचे राजकारण देखील तापले आहे.


दरम्यान, या काही ठिकाणी या योजनेत गैरप्रकार झाल्याचे प्रकार समोर आले होते. यावरून सरकारने अशावर कठोर कारवाईचे आदेश देत कारवाईचा बडगाही उगारला आहे. अशातच आता कामठी मौदा विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार टेकचंद सावरकर यांचे सुपुत्र यांचा एक खळबळजनक व्हिडिओ सध्या समाज मध्याममध्ये तूफान वायरल होत आहे. यात आमदार टेकचंद सावरकर (Tekchand Sawarkar) यांचा मुलगा लाभार्थी महिलांना योजनेचा लाभ मिळवून देण्याच्या नावावर 500 रुपये मागत असल्याचा दावा लाभार्थी महिलांनी केला आहे. 


विडिओ सोशल मीडियावर वायरल


सध्या शहरातील अनेक भागात इमारत बांधकाम कामगार महामंडळ अंतर्गत सध्या कामगारांना साहित्य वाटप कार्यक्रम सुरु आहे. दरम्यान कामठी विधानसभा मतदारसंघात ही हा कार्यक्रम सुरु असतांना हा प्रकार घडत असल्याचा महिलांकडून आरोप करण्यात आला आहे. याबाबतचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वायरल होते आहे. त्यामुळे या व्हिडिओची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.


लाडकी बहीण योजना मतांसाठी केलेला  जुगाड- टेकचंद सावरकर


नुकतेच कामठी मौदा विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार टेकचंद सावरकर यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरुन एक खळबळजनक वक्तव्य केलं होतं.  या संबंधितचा व्हिडिओ काँग्रेसचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रसिद्धी करत हे प्रकरण उजेडात आणले होते. त्यात त्यांनी म्हटले होते की, महायुतीला मतांचा दुष्काळ असल्यानं लाडकी बहीण योजना मतांसाठी केलेला  जुगाड आहे, हे भाजप आमदारानं मान्य केल्याचं विजय वडेट्टीवार यांनी त्या व्हिडीओचा आधार घेत म्हटलं. त्यामुळे आमदार टेकचंद सावरकर  चांगलेच चर्चेत आले होते. अशातच आता लाभार्थी महिलांना योजनेचा लाभ मिळवून देण्याच्या नावावर 500 रुपये मागत असल्याचा दावा केल्याने ही प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. मात्र या व्हिडीओतील सत्य पुढे आल्यावरच या प्रकरणाचा खुलासा होणार आहे. 


भाजप आमदारानं काय म्हटलं? 


आम्ही कशासाठी इतकी मोठी भानगड केली आहे, तुम्ही  सांगा, इमानदारीनं सांगा, अंत:करणातून सांगा, इतकी मोठी भानगड कशासाठी केलीय. ज्या दिवशी तुमच्या घराच्या पुढं इलेक्शनची पेटी येईल त्यावेळी माझी लाडकी बहीण कमळाला मत देईल. यासाठी आम्ही हे जुगाड केलं आहे. सर्वजण खोटं बोलले असतील, मी खरं बोलतोय. माझं खरं आहे की नाही, बोलायचं एक करायचं एक, मी काय रामदेव बाबांचा कार्यकर्ता आहे, असं कामठी मौदा विधानसभा मतदारसंघाचे आमदार टेकचंद सावरकर यांनी केलं.  


हे ही वाचा