बुलढाणा: जिल्ह्यातील मेहकर-चिखली मार्गावर मंगळवारी रात्री झालेल्या भीषण अपघातामध्ये तीन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मेहकर - चिखली रस्त्यावरील वरदडा या गावाजवळ हा अपघात (Buldhana Accident) झाला. एक दुचाकी एसटी बसवर (ST Bus) जोरात आदळून हा अपघात झाला. यावेळी दुचाकी प्रचंड वेगात असल्याने त्यावरुन प्रवास करणाऱ्या तिन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला.
प्राथमिक माहितीनुसार, हे तिन्ही तरुण मेहकर परिसरातील देवीचे दर्शन घेऊन आपल्या घरी परतत होते. गोपाल सुरडकर , सुनील सोनोने आणि धनंजय ठेंग, अशी या मृत तरुणांची नावे आहेत. हे तिघेही एकाच बाईकवरुन (Bike in Speed) प्रवास करत होते. अपघाताच्यावेळी त्यांच्या बाईकचा वेग खूपच जास्त होता. मेहकर-चिखली महामार्गावरुन (Mehkar Chikhli Road) वेगात दुचाकी पिटाळत असताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि ते वरदडा फाट्याजवळ आदिवासी पारधी शाळेजवळ (School) रस्त्यालगत उभ्या असणाऱ्या एका एसटी बसवर पाठीमागच्या बाजूला जाऊन आदळले.
ही एसटी बस बिघडली होती. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून ही बस वरदडा गावाजळ रस्त्यालगत उभी करुन ठेवण्यात आली. तरुणांची प्रचंड वेगात असलेली दुचाकी नेमकी याच एसटीवर येऊन जोरात आदळली. ही धडक इतकी जबरदस्त होती की, गोपाल, सुनील आणि धनंजय यांनी जागेवरच प्राण सोडले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्याची संधीही मिळाली नाही. या तिघांपैकी एकाच्या डोक्याला जबर मार लागल्यामुळे मेहकर-चिखली मार्गावर रक्ताचा सडा पडला होता. या दुर्दैवी घटनेमुळे बुलढाणा जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
कसारा घाटात कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याने भीषण अपघात
दोन दिवसांपूर्वी नाशिक-मुंबई महामार्गावर (Mumbai Nashik Highway) नवीन कसारा घाटात एक भीषण अपघात झाला होता. एका कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याने तो अनियंत्रित झाला. या भरधाव कंटेनरने 4 कार उडवल्या होत्या. यापैकी एका कारच्या बोनेटचा भाग धडकेत चेपला गेला. त्यामुळे या कारमधील लहान मुलगा आणि कंटेनर चालकाला गाडीचा पत्रा कापून बाहेर काढावे लागले होते. यासाठी तब्बल तासभर लागला होता. या दुर्घटनेत तीन जण गंभीर जखमी झाले होते.
आणखी वाचा
समृद्धी महामार्गावरील नरबळींची संख्या घटली, 2023 पेक्षा 2024 मध्ये कमी अपघात, नेमकं काय आहे कारण?
ट्रेन आणि प्लॅटफॉर्ममधील फटीत अडकला, फरफटत गेला, रोहा स्थानकात अंगावर काटा आणणारा अपघात