एक्स्प्लोर

IAS सुधाकर शिंदेंच्या मृत्यूने शोककळा, नांदेडमध्ये योग्य उपचार न मिळाल्याचा परिवाराचा आरोप

त्रिपुरा कॅडर 2015 च्या आयएएस बॅचचे आयएएस अधिकारी सुधाकर शिंदे (IAS sudhakar shinde ) यांचा कोरोनाने पुणे येथे उपचारादरम्यान दुर्देवी मृत्यू झाला. मात्र त्यांना नांदेड येथे रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिथे जसे पाहिजे तसे उपचार मिळाले नाहीत असा आरोप सुधाकर शिंदे यांचे बंधू ज्ञानेश्वर शिंदे यांनी केला आहे

परभणी :  त्रिपुरा कॅडर 2015 च्या आयएएस बॅचचे आयएएस अधिकारी सुधाकर शिंदे यांचा कोरोनाने पुणे येथे उपचारादरम्यान दुर्देवी मृत्यू झाला. मात्र त्यांना नांदेड येथे रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिथे जसे पाहिजे तसे उपचार मिळाले नाहीत. त्यामुळे आम्हालाही मोठी शिक्षा भोगावी लागली असल्याचा गंभीर आरोप सुधाकर शिंदे यांचे बंधू ज्ञानेश्वर शिंदे यांनी केला आहे. यामुळे परत एकदा आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. 35 वर्षीय आयएएस अधिकारी सुधाकर शिंदे हे सुट्टीनिमित्त गावी आले होते. पालम तालुक्यातील उमरा येथील गावी ते शेतातील विहिरीत पोहण्यास गेले आणि त्यानंतर त्यांना सर्दी आणि ताप येत होती. यामुळे त्यांनी पालम येथील एका खाजगी दवाखान्यात दाखवल्यानंतर नांदेड येथील गुरुगोविंद सिंग सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले. या ठिकाणी त्यांना उपचार जसे पाहिजे होते तसे मिळाले नसल्याचा आरोप त्यांच्या बंधूंनी केला आहे. चार दिवसांमध्ये तीन टेस्ट केल्या त्या तिन्ही निगेटिव्ह आल्या. मात्र तरीही त्यांची प्रकृती खालावत गेली आणि शेवटी परिवाराने त्यांना औरंगाबाद येथे हलवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शिंदे कुटुंबातून आरोग्य व्यवस्थेवरील रोष व्यक्त केला जातोय. शिवाय गावकऱ्यांनी ही कोरोनाचे रुग्ण किंवा इतर रुग्ण हे परभणीत राहून व्यवस्थित नीट होत आहेत. मात्र नांदेडच्या एवढ्या मोठ्या रुग्णालयात जाऊन देखील त्या ठिकाणी का बरे झाले नाहीत असा सवाल केला आहे.

सुधाकर शिंदे सुट्टी असल्याने दोन आठवड्यांपूर्वी कुटुंबीयांसह गावी आले होते.परभणीच्या पालम तालुक्यातील उमरा गावात त्यांचे वडील चार भाऊ राहतात. या ठिकाणी आल्यानंतर त्यांची तब्येत बिघडली आणि त्यांना नांदेड येथील गुरुगोविंदसिंग शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र तब्येत खालवल्याने त्यांना पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे हलवण्यात आले. औरंगाबादवरून पुणे येथील रुबी हॉल क्लिनिकला त्यांना हलवण्यात आले. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू असताना उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. सुधाकर शिंदे हे त्रिपुरा येथे अर्थ मंत्रालयात सचिव पदावर कार्यरत होते. सन 2015 च्या बॅचमध्ये त्यांची आयएएस अधिकारी म्हणून निवड झाली होती. त्यांचं शालेय शिक्षण परभणी येथील नवोदय विद्यालयात झाले. त्यानंतर औरंगाबाद येथून महाविद्यालय शिक्षण पूर्ण करून ते पुणे व नंतर दिल्ली येथे युपीएससी परीक्षा देण्यासाठी गेले आणि 2015 साली आयएएस अधिकारी झाले. त्यांच्या पश्चात त्यांच्या पश्चात वडील चार भाऊ तीन बहिणी पत्नी व तीन वर्षाची मुलगी असा मोठा परिवार आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manikrao Kokate : राज्यात पिक विमा योजना बंद होणार नाही, शेतकऱ्यांच्या भल्यासाठी...; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचं मोठं वक्तव्य
राज्यात पिक विमा योजना बंद होणार नाही, शेतकऱ्यांच्या भल्यासाठी...; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचं मोठं वक्तव्य
Prakash Abitkar : पालकमंत्री प्रकाश आबिटकरांकडून कोल्हापुरात ध्वजारोहण; म्हणाले, बहुमान मिळाल्याचा सार्थ अभिमान
पालकमंत्री प्रकाश आबिटकरांकडून कोल्हापुरात ध्वजारोहण; म्हणाले, बहुमान मिळाल्याचा सार्थ अभिमान
हिंगोलीतून माहूरला दिंडीत आले, भगर शेंगदाण्याची आमटी खाल्ल्याने 50 हून अधिक भाविकांना विषबाधा, 4 गंभीर
हिंगोलीतून माहूरला दिंडीत आले, भगर शेंगदाण्याची आमटी खाल्ल्याने 50 हून अधिक भाविकांना विषबाधा, 4 गंभीर
Hasan Mushrif : कोल्हापूरपासून 623 किमी अंतरावर हसन मुश्रीफांचा वाशिमला जीव काही केल्या रमेना! बैठका नाहीच, ध्वजारोहण करताच तत्काळ कोल्हापूरला रवाना!
कोल्हापूरपासून 623 किमी अंतरावर हसन मुश्रीफांचा वाशिमला जीव काही केल्या रमेना! बैठका नाहीच, ध्वजारोहण करताच तत्काळ कोल्हापूरला रवाना!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 12 PM 26 January 2024Republic Day Parade Kartavya Path : कर्तव्यपथावर विविध राज्यांच्या चित्ररथांचा देखावा, डोळ्याचं पारणं फेडणारा क्षणRepublic Day Air Show : प्रजासत्ताक दिनानिमित्त हवाई दलाच्या कसरती, कर्तव्यपथावर सोहळाGulen bury syndrome Death in Maharashtra : पुण्यात काम करणाऱ्या सोलापुरच्या तरुणाचा गुलेन बरी सिंड्रोमने मृत्यू

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manikrao Kokate : राज्यात पिक विमा योजना बंद होणार नाही, शेतकऱ्यांच्या भल्यासाठी...; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचं मोठं वक्तव्य
राज्यात पिक विमा योजना बंद होणार नाही, शेतकऱ्यांच्या भल्यासाठी...; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचं मोठं वक्तव्य
Prakash Abitkar : पालकमंत्री प्रकाश आबिटकरांकडून कोल्हापुरात ध्वजारोहण; म्हणाले, बहुमान मिळाल्याचा सार्थ अभिमान
पालकमंत्री प्रकाश आबिटकरांकडून कोल्हापुरात ध्वजारोहण; म्हणाले, बहुमान मिळाल्याचा सार्थ अभिमान
हिंगोलीतून माहूरला दिंडीत आले, भगर शेंगदाण्याची आमटी खाल्ल्याने 50 हून अधिक भाविकांना विषबाधा, 4 गंभीर
हिंगोलीतून माहूरला दिंडीत आले, भगर शेंगदाण्याची आमटी खाल्ल्याने 50 हून अधिक भाविकांना विषबाधा, 4 गंभीर
Hasan Mushrif : कोल्हापूरपासून 623 किमी अंतरावर हसन मुश्रीफांचा वाशिमला जीव काही केल्या रमेना! बैठका नाहीच, ध्वजारोहण करताच तत्काळ कोल्हापूरला रवाना!
कोल्हापूरपासून 623 किमी अंतरावर हसन मुश्रीफांचा वाशिमला जीव काही केल्या रमेना! बैठका नाहीच, ध्वजारोहण करताच तत्काळ कोल्हापूरला रवाना!
Walmik Karad:'त्या' दिवशी वाल्मिक कराड पुण्यातील प्रसिद्ध रुग्णालयात होता, संदीप क्षीरसागरांचा नवा गौप्यस्फोट
त्या' दिवशी वाल्मिक कराड पुण्यातील प्रसिद्ध रुग्णालयात होता, संदीप क्षीरसागरांचा नवा गौप्यस्फोट
Sanjay Raut :  शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला हे गरिबांचं लक्षण नाही; नरहरी झिरवाळांना राऊतांनी डिवचलं
शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला हे गरिबांचं लक्षण नाही; नरहरी झिरवाळांना राऊतांनी डिवचलं
Donald Trump : अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प राजवटीचे साईड इफेक्ट सुरुच! आता 1 लाख भारतीयांवर नवीन टांगती तलवार, सर्व फेडरल कार्यालयाकडून अहवाल मागवला
अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प राजवटीचे साईड इफेक्ट सुरुच! आता 1 लाख भारतीयांवर नवीन टांगती तलवार, सर्व फेडरल कार्यालयाकडून अहवाल मागवला
India vs England : टी-20 मालिकेदरम्यान टीम इंडियाला दुहेरी तगडा झटका; एकाचवेळी दोघांना दुखापत, 'या' 2 खेळाडूंची एन्ट्री
टी-20 मालिकेदरम्यान टीम इंडियाला दुहेरी तगडा झटका; एकाचवेळी दोघांना दुखापत, 'या' 2 खेळाडूंची एन्ट्री
Embed widget