एक्स्प्लोर

आपण कोणाविरुद्धही षडयंत्र रचत नाही- पंकजा मुंडे

मुंबईः जलसंधारण खातं काढल्यानं कसलीही नाराजी नाही. मिळालेल्या प्रत्येक संधीचं सोनं करणं हे माझ्या रक्तातच आहे, अशा शब्दांत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. सिंगापूर दौऱ्यावरुन परतल्यानंतर पंकजा मुंडेंनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.     मंत्रिमंडळ विस्तारानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंकजा मुंडेंकडून जलसंधारण हे महत्वाचं खातं काढून घेतलं आहे. त्यामुळे पंकजांनी आपली नाराजी ट्विटरद्वारे जाहिरपणे सांगितली होती. पंकजांच्या रॉयलस्टोन येथील निवासस्थानी आज कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.   बोलताना मुख्यमंत्र्यांना अप्रत्यक्ष टोला पंकजा मुंडे सिंगापूर दौऱ्यावरुन परतल्यानंतर राज्यभरातील कार्यकर्त्यांनी त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी मोठी गर्दी केली होती. जलसंधारण खात्याची मंत्री म्हणून काम करताना या खात्याची उंची वाढेल असं काम केलं. महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी जलयुक्त शिवार योजना यशस्वी केली. जनतेची पुण्याई माझ्या पाठीशी आहे, त्यामुळे कुठूनही उडी मारली तरी जनता मला झेलणार याचा मला विश्वास आहे, असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं.     राजकारणात आपण कधी कोणाचं वाईट केलं नाही. कोणाविरूध्द षडयंत्र रचलं नाही. कोणाच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केलं नाही. लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांची शिकवण मला असल्याने मिळालेल्या संधीचं सोनं करण्यासाठी मी अहोरात्र परिश्रम करीन, असं सांगत पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना अप्रत्यक्षपणे जोरदार टोला लगावला.     सध्या आपल्याकडे असलेल्या खात्यांमधूनही चांगले करून ते खातं लोकप्रिय करून दाखवू. त्यामुळे कार्यकर्त्यांनी प्रेमापोटी टोकाचं पाऊल उचलू नये, असं आवाहनही पंकजा मुंडे यांनी केलं.  

महत्त्वाच्या बातम्या

ह्रदयद्रावक... सेल्फी घेताना मित्र खदानीत पडला, मित्राला वाचवताना दोघेही बुडाले; तिघांचा मृत्यू, गावावर शोककळा
ह्रदयद्रावक... सेल्फी घेताना मित्र खदानीत पडला, मित्राला वाचवताना दोघेही बुडाले; तिघांचा मृत्यू, गावावर शोककळा
आळंदीत इंद्रायणी नदीला पूर, एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय, 10 कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर 
आळंदीत इंद्रायणी नदीला पूर, एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय, 10 कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर 
राष्ट्रवादीला दे धक्का, महापालिकेतील नगरसेविका अश्विनी कोळींचे पद धोक्यात; जात प्रमाणपत्र जप्त करण्याचे आदेश
राष्ट्रवादीला दे धक्का, महापालिकेतील नगरसेविका अश्विनी कोळींचे पद धोक्यात; जात प्रमाणपत्र जप्त करण्याचे आदेश
धक्कादायक! नांदेड जिल्ह्यात कौटुंबिक वादातून पत्नीवरच तीन गोळ्या झाडल्या; आरोपी पती फरार, शहरात खळबळ
धक्कादायक! नांदेड जिल्ह्यात कौटुंबिक वादातून पत्नीवरच तीन गोळ्या झाडल्या; आरोपी पती फरार, शहरात खळबळ

व्हिडीओ

Taloja Accident News : नवी मुंबई तळोजात भीषण अपघात, बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले
Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?
Raigad Flood | चार नद्या धोक्याच्या पातळीवर; बचावकार्याचं आव्हान, रायगडला पाण्याने वेढलं | ABP Majha Special Report
Vasai-Virar Flood | पावसाने वसई-विरार, नालासोपारा जलमय; जनजीवन पूर्ण विस्कळीत - ABP Majha
Missing Link Landslide | उद्घाटनानंतरच दरड; मिसिंगलिंकवरुन राजकारण | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dipali Sayyed : तुम्हाला का झोंबतंय? 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'वर रुपाली चाकणकरांचा 25 कोटीचा दावा, दिपाली सय्यद यांचा रोख सवाल
तुम्हाला का झोंबतंय? 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'वर रुपाली चाकणकरांचा 25 कोटीचा दावा, दिपाली सय्यद यांचा रोख सवाल
ह्रदयद्रावक... सेल्फी घेताना मित्र खदानीत पडला, मित्राला वाचवताना दोघेही बुडाले; तिघांचा मृत्यू, गावावर शोककळा
ह्रदयद्रावक... सेल्फी घेताना मित्र खदानीत पडला, मित्राला वाचवताना दोघेही बुडाले; तिघांचा मृत्यू, गावावर शोककळा
तावडे-जयंत पाटलांची भेट, शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीत येणार का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्लीतून दिली माहिती
तावडे-जयंत पाटलांची भेट, शरद पवारांची राष्ट्रवादी महायुतीत येणार का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्लीतून दिली माहिती
SIP Calculator: दरमहा 3000 रुपयांच्या गुंतवणुकीवर 15 लाख रुपयांचा फंड बनवणं शक्य? जाणून घ्या संपूर्ण समीकरण
दरमहा 3000 रुपयांच्या गुंतवणुकीवर 15 लाख रुपयांचा फंड बनवणं शक्य? जाणून घ्या संपूर्ण समीकरण
धक्कादायक! नांदेड जिल्ह्यात कौटुंबिक वादातून पत्नीवरच तीन गोळ्या झाडल्या; आरोपी पती फरार, शहरात खळबळ
धक्कादायक! नांदेड जिल्ह्यात कौटुंबिक वादातून पत्नीवरच तीन गोळ्या झाडल्या; आरोपी पती फरार, शहरात खळबळ
राष्ट्रवादीला दे धक्का, महापालिकेतील नगरसेविका अश्विनी कोळींचे पद धोक्यात; जात प्रमाणपत्र जप्त करण्याचे आदेश
राष्ट्रवादीला दे धक्का, महापालिकेतील नगरसेविका अश्विनी कोळींचे पद धोक्यात; जात प्रमाणपत्र जप्त करण्याचे आदेश
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 जुलै 2026 | मंगळवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 जुलै 2026 | मंगळवार 
Ambadas Danve: रमाई आवास योजनेत मोठा भ्रष्टाचार; भाजप नगरसेविकेचा मुलगा लाभार्थी, देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदेंच्या नावे टॅक्स पावती; अंबादास दानवेंचा गंभीर आरोप
छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील रमाई आवास योजनेत मोठा भ्रष्टाचार; भाजप नगरसेविकेचा मुलगा लाभार्थी, देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदेंच्या नावे टॅक्स पावती; अंबादास दानवेंचा गंभीर आरोप
Embed widget