एक्स्प्लोर

मी राष्ट्रवादीत होतो, रियाज भाटींचा गौप्यस्फोट

मुंबई:  रियाज भाटीवरुन सुरु झालेलं वादळ राष्ट्रवादीच्याच अंगावर येण्याची चिन्ह आहेत. कारण मी राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता होतो, असा दावा भाटी यांनी एबीपी माझाच्या 'माझा विशेष' कार्यक्रमात केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मुंबई अध्यक्ष नरेंद्र वर्मा यांनी मला पद दिलं होतं, असं भाटी यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेवेळी मुंबईत मी राष्ट्रवादीचा पदाधिकारी होतो, असं भाटी यांनी म्हटलं आहे. त्यामुळे भाटी प्रकरण राष्ट्रवादीवरच बूमरँग होण्याची शक्यता आहे. नवाब मलिक यांचा आरोप अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद असलेल्या भाजप कार्यकारिणीचे सदस्य आणि गुंड रियाज भाटी यांच्यावर मोक्का अंतर्गत गुन्हा का दाखल झाला नाही, असा सवाल राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांनी केला आहे. रियाज भाटी यांचे थेट दाऊदशी संधान असल्याचा दावाही मलिक यांनी केला आहे. दाऊदशी संबंध असणाऱ्या रियाज भाटीला भाजपानं पाठिशी घातलं आणि आशिष शेलारांनी भाटी यांना एमसीएच्या मार्केटिंग कमिटीत घेतलं, असा आरोप मलिक यांनी केला आहे. रियाज भाटी यांनी आशिष शेलारांना एमसीए निवडणुकीत मतं मिळवून देण्यासाठी विल्सन कॉलेजच्या प्राध्यापकांना धमकावल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे. स्पेशल रिपोर्ट : रियाज भाटी, भाजप आणि दाऊद आशिष शेलार यांचं उत्तर नवाब मलिक यांनाच गँग आणि टोळ्यांची गरज निवडणुकीत भासते. त्यांना स्मृतीभ्रंश झाला आहे. जुनेच काहीतरी आठवते. त्यांना वैद्यकीय उपचाराची गरज आहे. मी नवाब मलिकांवर न्यायालयात मानहानीची केस दाखल करणार आहेच. शिवाय मीच पोलिस आयुक्तांना फोन करून रियाज भाटी प्रकरणी चौकशीची मागणी केली आहे, असं उत्तर आशिष शेलार यांनी दिलं. 'भाटी कोण पवारांनाच विचारा' दाऊदशी कथित संबंध असणारे रियाज भाटी कोण आहेत हे पवारांना विचारा, असं म्हणत राष्ट्रवादीच्या आरोपांना भाजपनं उत्तर दिलं. शरद पवार यांनीच रियाज भाटी यांना मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या एका महत्त्वाच्या पदावर घेतलं होतं. त्यामुळे रियाज भाटी कोण हे पवारांना विचारा, असा टोला भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी लगावला आहे. रियाज भाटींचं स्पष्टीकरण दाऊशी आपला काहीही संबंध नाही. दाऊदचा माणूस असतो, तर आपल्याला संरक्षण कसं मिळालं असतं, असा सवाल रियाज भाटींनी केला आहे. माझ्यावर कुठलाही गुन्हा नाही, पण पासपोर्टप्रकरणात खटला सुरु आहे. मात्र माझ्याकडे दोन पासपोर्ट नाहीत, असा दावा भाटींनी केला नवाब मलिकांवर खटला दाखल करणार राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी माझ्या चारित्र्यावर संशय व्यक्त केल्याने त्यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा करणार असल्याचंही रियाज भाटी यांनी सांगितलं आहे. माझा विशेष संपूर्ण व्हिडीओ संबंधित बातम्या ना भाजपशी संबंध, ना दाऊदशी, रियाज भाटींचं स्पष्टीकरण रियाज भाटी कोण हे पवारांनाच विचारा, भाजपचा राष्ट्रवादीवर पलटवार स्पेशल रिपोर्ट : रियाज भाटी, भाजप आणि दाऊद

महत्त्वाच्या बातम्या

सरकारचा मोठा निर्णय, MPSC चे अध्यक्ष विवेक भीमनवारांना पाठवलं सक्तीच्या रजेवर, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश
सरकारचा मोठा निर्णय, MPSC चे अध्यक्ष विवेक भीमनवारांना पाठवलं सक्तीच्या रजेवर, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश
निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आंदोलन! मुंबई पोलिसांकडून आदित्य ठाकरेंसह अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल
निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आंदोलन! मुंबई पोलिसांकडून आदित्य ठाकरेंसह अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल
थोड्याच महिन्यात सत्ता बदलणार, आमच्या मातीसाठी, संविधानासाठी लढत राहणार, आदित्य ठाकरेंचा एल्गार
थोड्याच महिन्यात सत्ता बदलणार, आमच्या मातीसाठी, संविधानासाठी लढत राहणार, आदित्य ठाकरेंचा एल्गार
Mumbai Protest Aaditya Thackeray and Amit Thackeray: अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chief Justice of India Surya Kant: इंडिया आघाडीचा मोर्चा सुप्रीम कोर्टावर धडकणार, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेटीची विनंती फेटाळून लावली
इंडिया आघाडीचा मोर्चा सुप्रीम कोर्टावर धडकणार, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेटीची विनंती फेटाळून लावली
'माझा कमी अभ्यास असल्याने भारती विद्यापीठात शिकलो नाही, मी गरीबासारखा साताऱ्यात शिकलो त्यामुळे..' एमपीएससी आंदोलनातून शिवेंदराजेंचा विश्वजित कदमांना अप्रत्यक्ष टोला
'माझा कमी अभ्यास असल्याने भारती विद्यापीठात शिकलो नाही, मी गरीबासारखा साताऱ्यात शिकलो त्यामुळे..' एमपीएससी आंदोलनातून शिवेंदराजेंचा विश्वजित कदमांना अप्रत्यक्ष टोला
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Mumbai Protest: ज्युनिअर ठाकरे मैदानात, शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक
ज्युनिअर ठाकरे मैदानात,शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक
Rahul Gandhi: 'आम्हाला असा भारत नको..' इंडियाचा आघाडीचा अभूतपूर्व निर्णय, थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा धडकणार; राहुल गांधी म्हणाले, 'हा राजकीय पक्षांचा मोर्चा नाही, तर..'
'आम्हाला असा भारत नको..' इंडियाचा आघाडीचा अभूतपूर्व निर्णय, थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा धडकणार; राहुल गांधी म्हणाले, 'हा राजकीय पक्षांचा मोर्चा नाही, तर..'
Abhijeet Dipke: 'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
Mumbai Protest Aaditya Thackeray and Amit Thackeray: अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
Embed widget