एक्स्प्लोर
जन आशीर्वाद यात्रा कोणत्याही पदासाठी नाही, मला महाराष्ट्र घडवायचा आहे : आदित्य ठाकरे
युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेला आज जळगाव जिल्ह्यातून सुरुवात झाली आहे. या यात्रेच्या माध्यमातून आदित्य ठाकरे जनतेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत.
![जन आशीर्वाद यात्रा कोणत्याही पदासाठी नाही, मला महाराष्ट्र घडवायचा आहे : आदित्य ठाकरे i am organising jan ashirwad yatra to make new Maharashtra - aditya thackeray जन आशीर्वाद यात्रा कोणत्याही पदासाठी नाही, मला महाराष्ट्र घडवायचा आहे : आदित्य ठाकरे](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/07/18164726/aditya-Thackeray.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
जळगाव : युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेला आज जळगाव जिल्ह्यातून सुरुवात झाली आहे. या यात्रेच्या माध्यमातून आदित्य ठाकरे जनतेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत. ही जन आशीर्वाद यात्रा राज्य सरकारमध्ये कोणतेही पद मिळवण्यासाठी आयोजित केलेली नसून मला महाराष्ट्र घडवायचा आहे, असे प्रतिपादन आदित्य ठाकरे यांनी केले. जळगावात आयोजित सभेत ते बोलत होते.
सभेदरम्यान आदित्य ठाकरे म्हणाले की, "मी कोणतेही पद मिळवण्यासाठी ही यात्रा आयोजित केलेली नाही. महा काहीतरी बनायचं आहे म्हणून ही यात्रा काढलेली नाही. मला महाराष्ट्र घडवायचा आहे. कोणतीही तारीख, कोणताही मुहूर्त न पाहता मी आजपासून बालेकिल्ल्यातून सुरुवात करतोय, कारण मला प्रत्येक नागरिकाचे आभार मानायचे आहेत."
आदित्य ठाकरे म्हणाले की, "लोकसभा निडणुकीत ज्यांनी शिवसेनेला मतदान केले नव्हते, मला त्यांची मनं जिंकायची आहेत. आपल्याला महाराष्ट्र घडवायचा आहे, त्यासाठी प्रत्येकाला सोबत घेऊन काम करावे लागणार आहे."
व्हिडीओ पाहा
आदित्य म्हणाले की, "राज्यातला शेतकरी सध्या अडचणीत आहे, राज्यात सर्वत्र जातीपातीचं राजकारण सुरु आहे. हे चित्र बदलण्यासाठी ही यात्रा काढली आहे. मतं मागण्यासाठी आलेलो नाही. माझ्यासाठी ही तीर्थ यात्रा आहे. महाराष्ट्र जिंकण्याची हीच वेळ आहे."
जन आशीर्वाद यात्रा हा साधारण चार हजार किलोमीटरचा प्रवास आदित्य ठाकरे करणार आहेत. समाजातील प्रत्येक घटक, युवाशक्तीशी संवाद साधण्याचा प्रयत्न आदित्य करतील.
18 जुलै - जळगाव
19 जुलै - धुळे, मालेगाव
20 जुलै - नाशिक शहर
21 जुलै - नाशिक ग्रामीण, नगर
22 जुलै - नगर, श्रीरामपूर, शिर्डी
येत्या काळात आदित्य ठाकरे शिवसेनेचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरणार असल्याच्या जोरदार चर्चा आहेत. त्या पार्श्वभूमीवर हा दौरा त्यांच्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. आदित्य ठाकरे गेल्या काही काळात राजकीयदृष्ट्या सक्रीय झाले आहेत.
संबंधित बातम्या मुंबईत येत्या काळात 500 इलेक्ट्रीक बेस्ट बस सुरु होणार : आदित्य ठाकरे डिनर डेटवर गेलेल्या आदित्य ठाकरे आणि दिशा पटानीचा वाढदिवसही एकाच दिवशी! "मी निवडणूक लढवावी की नाही याचा निर्णय उद्धव साहेब घेतील," : आदित्य ठाकरे माझ्या राजकीय निर्णयापेक्षा दुष्काळ निवारण महत्त्वाचे- आदित्य ठाकरेकृष्णाजी नगर मैदान, जळगाव पाचोरा मधून आज जन आशीर्वाद यात्रेचा शुभारंभ केला. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात जाऊन सर्वांचे आशीर्वाद मी घेणार आहे. मला महाराष्ट्र घडवायचा आहे त्यासाठी तुमची साथ हवी आहे! pic.twitter.com/7iip5ViYbq
— Aaditya Thackeray (@AUThackeray) July 18, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
क्राईम
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)