एक्स्प्लोर

धनगर समाजाने मतं दिली असती, तर केंद्रात मंत्री असतो: महादेव जानकर

पंढरपूर:  मला धनगर समाजापुरता जोखडून ठेवू नका. धनगर समाज आणि धनगर आरक्षणामुळे मी राज्याचा मंत्री झालो नाही. धनगर समाजाने मतं दिली असती, तर आज मी केंद्रात मंत्री असतो, असं वक्तव्य राज्याचे दुग्धविकास मंत्री आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी केलं. ते पंढरपुरात बोलत होते. याशिवाय धनगर आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी केंद्रीय पातळीवर प्रयत्न सुरु असल्याचंही त्यांनी सांगितलं. काय म्हणाले महादेव जानकर? "मी मंत्री झालोय ते केवळ धनगर आरक्षणामुळे नाही, तुम्ही मला त्यात अडकवू नका. आय एम नॉट लीडर ओन्ली धनगर कम्युनिटी. (प्रश्न - तुमची ओळख कुणामुळे-कशामुळे समाजामुळे झाली ना)  - बिलकुल नाही. मी राष्ट्रीय समाज म्हणून….. माझा पहिला आमदार कोण आहे..  बाळासाहेब पाटील हा कुठल्या जातीचा आहे.? मला धनगरांनी मतं दिली असती तर मी केंद्रात मंत्री झालो असतो, आज राज्यात मंत्री नसतो. बारामती मतदार संघात धनगराच्या गावात मी खाली आलोया, अन ब्राह्मणाच्या आळीला 70 हजार लीड घेतलंय, मराठ्यांच्या आळीला लीड घेतलंय. मला पक्ष काढल्यानंतर सर्व समाजाला सोबत घेऊन जावं लागतं. एकट्या जातीवर होत नसतं". धनगर, मराठा आरक्षणासाठी प्रयत्न यावेळी जानकरांनी धनगर आरक्षणासोबतच, मराठा आरक्षणाबाबतही भाष्य केलं. धनगर समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आमचे केंद्रीय पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. याशिवाय मराठा आरक्षणासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. नुकत्याच झालेल्या एनडीएच्या बैठकीत मी मोदींना धनगर आरक्षणाबाबत विनंती केली, असं जानकर म्हणाले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यामुळेच मराठा समाज आरक्षण रखडलं, असा आरोप त्यांनी केला.  आरक्षणाबाबत गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे घिसाडघाई करून काही फायदा नाही, असं जानकरांनी नमूद केलं. राजू शेट्टी-सदाभाऊंच्या वादावर भाष्य यावेळी जानकरांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्यातील वाद सोडवण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचं सांगितलं. मी मध्यस्थी करुन सर्वांना एकत्र आणणार असल्याचं जानकर म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: मुंबईतील मोकळ्या जागा आणि क्रीडांगणं वाचवण्यासाठी आदित्य ठाकरेचं आज आंदोलन
Maharashtra Live News Updates: मुंबईतील मोकळ्या जागा आणि क्रीडांगणं वाचवण्यासाठी आदित्य ठाकरेचं आज आंदोलन
Pune News : पोषण आहाराचा निकृष्ट दर्जा दाखवणाऱ्या पुण्यातील 'त्या' अंगणवाडी सेविकेला दिलासा, टीकेचे झोड उठताच सेवामुक्तीची कारवाई अखेर रद्द, नेमकं प्रकरण काय?
पोषण आहाराचा निकृष्ट दर्जा दाखवणाऱ्या पुण्यातील 'त्या' अंगणवाडी सेविकेला अखेर दिलासा, टीकेचे झोड उठताच सेवामुक्तीची कारवाई रद्द, नेमकं प्रकरण काय?
Chhatrapati Sambhaji Nagar Boy Jumps Down From Mountain: खवड्या डोंगर प्रकरणाला कौटुंबिक वादाचा चक्रावून टाकणारा नवा अँगल, ती तिसरी व्यक्ती कोण?; आईच्या व्हिडीओने सोशल मीडियावर खळबळ
खवड्या डोंगर प्रकरणाला कौटुंबिक वादाचा चक्रावून टाकणारा नवा अँगल, ती तिसरी व्यक्ती कोण?; आईच्या व्हिडीओने सोशल मीडियावर खळबळ
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhuleshwarcha Raja : मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात,आगमन मिरवणुकीत घडला प्रकार, तीन जण जखमी
मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत दुर्घटना, अपघातात तीन जण जखमी
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
Embed widget