एक्स्प्लोर
Advertisement
मी हनुमान, सोन्याच्या लंकेतील शेतीरुपी सीता शोधायचीय : सदाभाऊ
धुळे : सरकारमध्ये माझी भूमिका हनुमान म्हणून आहे. सोन्याच्या या लंकेमध्ये शेतकऱ्याच्या शेतीरुपी सीतेचा मला शोध घ्यायचा आहे, असं कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत म्हणाले.
धुळ्याकडून जळगावकडे जात असताना कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे काही वेळासाठी धुळ्यातील एका भाजप कार्यकर्त्याच्या घरी थांबले होते, त्या वेळी त्यांनी हे विधान केलं.
शेतकरी कर्जासंदर्भात विचार केला तर केवळ 30 टक्क्यांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेलं नाही, असे सदाभाऊ म्हणाले.
कर्जमुक्ती करून शेतकऱ्यांना फायदा झाला आहे का? असा प्रश्न उपस्थित करीत शेतकऱ्यांना पायाभूत सुविधा मिळायला हव्यात, असं मत व्यक्त करीत विरोधकांचा त्यांनी समाचार घेतला.
“शेतकऱ्यांबद्दल आत्मियतेचा आव आणणाऱ्यांचं ज्यावेळी सरकार होतं, त्याकाळात म्हणजे गेल्या 30 वर्षात कांदा चाळीसाठी 135 कोटी खर्च झाले. मात्र, युतीच्या काळात अवघ्या अडीच वर्षात कांदा चाळीसाठी 52 कोटी खर्च करून 10 लाख मॅट्रिक टन कांदा या चाळीत सुरक्षित राहील”, असा विश्वास कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केला.
“कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, उपसभापती यापुढे व्यापारी किंवा सोसायटी वर्गातून नाही तर थेट शेतकऱ्यांमधून निवडला जाईल, तशी बाजार समितीच्या कायद्यात लवकरच सुधारणा करण्यात येणार आहे. बाजार समिती निवडणुकीत शेतकरी मतदान करू शकेल, ही महत्वपूर्ण सुधारणा बाजार समिती कायद्यात लवकरच होणार असल्याचं राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सांगितले.
दरम्यान, कृषी विद्यापीठ धुळ्यात होण्यासाठी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना निवेदन दिलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
अहमदनगर
राजकारण
कोल्हापूर
Advertisement