मुंबई : राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना वापरलेल्या 'दारुवाली बाई' या शब्दावर मी ठाम आहे, असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. शिवाय या प्रकरणी चौकशी करणारा महिला आयोग निष्पक्ष नाही, असा आरोपही मलिक यांनी केला आहे.

 

 

दारु कंपन्यांसंदर्भात केलेल्या वक्तव्यावरुन अडचणीत आलेल्या पंकजा मुंडेंवर नवाब मलिक यांनी बोचऱ्या शब्दाच टीका केली होती. मृणालताई गोरे किंवा अहिल्याबाई रांगणेकर यांचा मुंबईकर 'पाणीवाली बाई' म्हणून गौरव करायचे. तशा पंकजा मुंडे यांची 'दारुवाली बाई' म्हणून ओळख झाल्याची बोचरी टीका नवाब मलिक यांनी केली होती.

 

पंकजा मुंडे 'दारुवाली बाई' म्हणून ओळखतील : मलिक


 

दारु कंपन्यांमध्ये संचालक पद मिळवण्यासाठी पंकजाताईंनी दोन डीन म्हणजे डायरेक्टर आयडेन्टिफिकेशन नंबर वापरल्याचा आरोप नबाव मलिक यांनी केला होता.

 

 

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर या भाजपच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होतात, त्यामुळे हा पदाचा दुरुपयोग आहे, असंही मलिक म्हणाले. तसंच अभिनेत्री मैथिली जावकर गैरवर्तनप्रकरणी भाजप पदाधिकारी गणेश पांडेवर अद्याप कारवाई का नाही, असा सवालही त्यांनी विचारला आहे.