सांगली :  केंद्रात नरेंद्र मोदी सत्तेत येऊन दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. मात्र दोन वर्षात सरकारने काहीही केलेलं नाही, असा दावा काँग्रेसने केला आहे. त्याच पार्श्वभूमीवर भाजप सरकारच्या 'अच्छे दिन' घोषणेची दुसरी पुण्यतिथी आज काँग्रेसने स्टेशन चौकात घातली.

 

यावेळी प्रतिकात्मक आंदोलन करत भाजप सरकारचा निषेध करण्यात आला.

 

काँग्रेस कार्यकर्त्यांनी पुण्यतिथीच्या निमित्ताने मुंडन आंदोलन  केलं. मात्र याचवेळी शेतकरी आत्महत्येचं प्रतिकात्मक आंदोलन करत असताना, दोरीचा फास गळयात अडकवून टेबलवर उभा असलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांचा पाय घसरला आणि तो फास त्याच्या गळ्यात अडकला.

 

मात्र सुदैवाने तिथे असलेल्या इतर कार्यकर्त्यांनी तो अडकलेला फास वेळीच काढला आणि अनर्थ टळला. यामुळे उपस्थित कार्यकर्त्याची चांगलीच ताराबळ उडाली.

 

काही महिन्यांपूर्वीच दिल्लीत 'आप'च्या आंदोलनादरम्यान एका शेतकऱ्याने आत्महत्या केली होती.