कोल्हापूर : सख्ख्या भावानेच त्याच्या दोन भावांवर गोळीबार केल्याची घटना कोल्हापूरमध्ये घडली आहे. या घटनेत एका भावाचा जागीच मृत्यू झाला असून एक भाऊ गंभीर जखमी आहे. पन्हाळा तालुक्यातील पणोरे गावात हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

 

 

पणोरे गावात घाग कुटुंबीय एकत्र राहत होतं. मात्र धाकटे भाऊ मदत करत नसल्याचा राग बळवंत घागच्या मनात होता. बळवंत घागने पहिल्यांदा झोपेत असलेला भावावर (पांडुरंग घाग)  गोळ्या झाडल्या. गोळ्यांच्या आवाजाने उठलेल्या छोट्या भावाने (संभाजी घाग) त्याला विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र बळवंत घागने त्याच्यावरही गोळीबार केला.

 

 

यात पांडुरंग घागचा जागीच मृत्यू झाला तर संभाजी घाग गंभीर जखमी झाला आहे. जखमी भावावर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

 

 

सख्खा भाऊच पक्का वैरी बनल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. शिवाय या प्रकरणी अद्यापही गुन्हा दाखल झालेला नाही.