एक्स्प्लोर
Advertisement
माढ्यातील जिनिंग मिलला भीषण आग, तब्बल 10 कोटींचं नुकसान
माढा (सोलापूर) : माढा तालुक्यातील म्हैसगाव येथील संजय शिंदे यांच्या विठ्ठल कॉर्पोरेशनच्या जिनिंग मिलला काल (17 मार्च) सायंकाळी अचानक आग लागली. या आगीत तब्बल 10 कोटी रुपयांचे नुकसान झाले.
म्हैसगाव येथे विठ्ठल कॉर्पोरेशन कंपनीच्या वतीने साखर कारखाना, सूतगिरणी, को-जनरेशन, इथेनॉल प्रकल्प यासह जिनिंग मिल हे व्यवसाय सुरु आहेत. काल सायंकाळी जिनिंग मिलमध्ये घर्षणाने आगीला सुरुवात झाली आणि या ठिकाणी असलेले शेकडो टन कापूस, सरकी, पेंड याने पेट गेतला. पाहता पाहता आगीने रौद्र रूप धारण केले.
आग लागलेली पाहताच सर्व कामगार आणि कर्मचारी बाहेर पळत आले. तातडीने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. पंढरपूर, माढा, कुर्डुवाडी परिसरातील 8 अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग वीजवण्याचा आटोकाट प्रयत्न केला.
अखेर 7 ते 8 तासांनंतर आग शांत करण्यात यश आले. मात्र, तोवर जवळपास 10 कोटी रुपयांचा कच्चा माल, मशिनरी आणि इमारती आगीच्या भस्मस्थानी पडल्या. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही मनुष्यहानी झाली नसली तरी जिनिंग मिलच्या इमारतींच्या लोखंडी बलाढ्य अँगल आणि खांब देखील या आगीत वाकडे तिकडे होऊन गेले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
बातम्या
निवडणूक
Advertisement