SSC-HSC Exam Timetable | दहावी, बारावी परीक्षेचं संभाव्य वेळापत्रक जाहीर
विद्यार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन करता यावे व त्यांच्या मनावरील ताण कमी करण्याच्या दृष्टीने हे वेळापत्रक लवकर जाहीर केल्याची माहिती राज्य शिक्षण मंडळाने परिपत्रकाद्वारे दिली आहे. व्हॉट्सअॅपवर व्हायरल होणार्या वेळापत्रकांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन मंडळाने केले आहे.

मुंबई : दहावी आणि बारावीच्या फेब्रुवारी-मार्च 2020 मध्ये होणार्या लेखी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक मंगळवारी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून जाहीर करण्यात आलं आहे. बारावीची परीक्षा 18 फेब्रुवारीला तर दहावीची परीक्षा 3 मार्चपासून सुरू होणार आहे. परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या www.mahahsscboard.maharashtra.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या विभागीय मंडळांतर्फे दहावी व बारावीच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत. मंडळाने जाहीर केलेल्या संभाव्य वेळापत्रकानुसार बारावीची लेखी परीक्षा 18 फेब्रुवारी ते 18 मार्च 2020 दरम्यान होणार आहे. तर दहावीची परीक्षा 3 ते 23 मार्च 2020 दरम्यान होणार आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखांबाबत राज्यातील लाखो विद्यार्थी पालकांना प्रतीक्षा असते.
विद्यार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन करता यावे व त्यांच्या मनावरील ताण कमी करण्याच्या दृष्टीने हे वेळापत्रक लवकर जाहीर केल्याची माहिती राज्य शिक्षण मंडळाने परिपत्रकाद्वारे दिली आहे. परीक्षेपूर्वी शाळा आणि ज्युनियर कॉलेजकडे छापील स्वरुपात पाठवण्यात येणारे वेळापत्रक हे अंतिम असणार आहे, असं मंडळाकडून जाहीर करण्यात आलं आहे.
संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्याबरोबरच प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी-तोंडी परीक्षा किंवा इतर विषयांचे वेळापत्रक शाळा आणि ज्युनियर कॉलेजना स्वतंत्रपणे कळवण्यात येणार आहे. परीक्षेच्या तारखांवर कोणाला आक्षेप असल्यास 15 दिवसांत त्यासंदर्भातील तक्रारी मंडळाकडे करण्यात यावे, असेही मंडळाने स्पष्ट केलं आहे.
व्हॉट्सअॅपवर व्हायरल होणार्या वेळापत्रकांवर विश्वास नका
व्हॉट्सअॅपवर व्हायरल होणार्या वेळापत्रकांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन मंडळाने केले आहे. परीक्षांची अनेक वेळापत्रके व्हॉट्सअॅप किंवा इतर सोशल मीडियावरुन व्हायरल होतात. मात्र या वेळापत्रकांवर विश्वास न ठेवता मंडळाकडून छापील स्वरूपात शाळा आणि ज्युनियर कॉलेजांना पाठवण्यात येणार्या वेळापत्रकानुसार तारखा पडताळून घ्याव्या, असं आवाहन मंडळाने पत्रकाद्वारे केलं आहे.
VIDEO | Majha 20-20 | आत्तापर्यंतच्या घडामोडींचा वेगवान आढावा
Before You Go
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
महत्त्वाच्या बातम्या





















