एक्स्प्लोर
Advertisement
पिंपरीत खड्ड्यात अचानक उकळतं पाणी, बाटलीही वितळते
सहल केंद्रातील एका खड्ड्यातून अचानक उकळतं गरम पाणी येऊ लागलंय.
पुणे: पिंपरी चिंचवडमध्ये थंडीच्या दिवसातही जमीनीतून अचानक उकळतं पाणी येऊ लागलं.
भोसरीत पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सहल केंद्र आहे. या सहल केंद्रातील एका खड्ड्यातून अचानक उकळतं गरम पाणी येऊ लागलंय. यामुळे नागरिकांमध्ये आश्चर्य आणि भीतीचे वातावरण आहे.
हे पाणी एवढे गरम आहे कि प्लॅस्टिकची बाटली अवघी दहा सेकंद जरी या खड्ड्यात ठेवली तरी ती वितळून जाते. याबाबत भूगर्भ शास्त्रज्ञांनी पाहणी करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
दरम्यान, प्लॅस्टिकची बातमी वितळेल इतकं उकळतं पाणी खड्ड्यातून येत असल्यामुळे, हा नेमका काय प्रकार आहे, याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे.
पिंपरी परिसरात ही बातमी अगदी 'पाण्यासारखी' पसरली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement